Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एफपीओ म्हणजे काय? What is FPO?

What is FPO

What is FPO: एखाद्या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होण्यापूर्वी त्याचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) बाजारात आणला जातो. यातील सुरूवातीच्या इश्युला शेअर मार्केटच्या भाषेत आयपीओ म्हणतात आणि त्यानंतर आणल्या जाणाऱ्या इश्यूला एफपीओ (Follow-On Public Offer-FPO) म्हटले जाते. आयपीओ आणि एफपीओ अशा दोन्ही मार्गांनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येते.

एखाद्या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होण्यापूर्वी त्याचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) बाजारात आणला जातो. यातील सुरूवातीच्या इश्युला शेअर मार्केटच्या भाषेत आयपीओ म्हणतात आणि त्यानंतर आणल्या जाणाऱ्या इश्यूला एफपीओ (Follow-On Public Offer-FPO) म्हटले जाते. आयपीओ आणि एफपीओ अशा दोन्ही मार्गांनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येते. तसेच या दोन्ही मार्गांचा वापर करून कंपन्या निधी उभारतात. तर आज आपण एफपीओ म्हणजे काय? आणि एफपीओद्वारे कशाप्रकारे गुंतवणूक केली जाते, हे पाहणार आहोत.

एफपीओ म्हणजे काय? | What is FPO?

कोणत्याही नवीन कंपनीची सुरूवात आयपीओद्वारे होते. बऱ्याचदा बाजारातून निधी उभा करण्यासाठी कंपन्या आयपीओ आणतात. आयपीओनंतर कंपनीची शेअर मार्केटमध्ये रीतसर नोंदणी होती. पण कालांतराने कंपनीला पुन्हा एकदा भांडवलाची गरज लागली की, कंपनी पुन्हा आपले काही शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देते. या प्रक्रियेला एफपीओ (Follow-On Public Offer-FPO) असे म्हटले जाते.

आयपीओ म्हणजे काय? | What is IPO?

निधी उभारण्यासाठी आयपीओ प्रक्रिया कंपन्यांना फायदेशीर असतं. शिवाय यात पारदर्शकताही अधिक असते. शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering  - IPO) जाहीर करते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बनते आणि कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करता येतात.

एफपीओमध्ये कंपनी नव्याने शेअर्स इश्यू करते. त्याचबरोबर कंपनीतील प्रमोटर्ससुद्धा  एफपीओमध्ये आपले शेअर्स विकतात. याचा फायदा नवीन गुंतवणूकदार आणि जुने भागभांडवलदार घेऊ शकतात. बऱ्याचवेळा एफपीओमध्ये कंपनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात इश्यू उपलब्ध करून देते. किरकोळ गुंतवणूकदारांना आणखी सूट दिली जाते. 

IPO VS FPO

आयपीओ नंतरही कंपन्या एफपीओ का आणतात?

आयपीओद्वारे जशा कंपन्या निधी उभा करतात. तसेच एफपीओमधूनही कंपन्या निधी गोळा करतात. बऱ्याचवेळा कंपन्या नव्याने भांडवल उभे करण्यासाठी एफपीओ आणतात. तर काही कंपन्या विशिष्ट उद्देश ठेवून शेअर्सची संख्या वाढवून कंपनीचे कर्ज कमी करण्यासाठी एफपीओ आणतात.

एफपीओद्वारे शेअर्स कसे विकत घेतले जातात?

आयपीओप्रमाणेच गुंतवणूकदारांना एफपीओ प्रक्रियेद्वारे शेअर्स विकत घेता येतात. यासाठी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणे गरजेचे आहे. तसेच गुंतवणूकदाराला यासाठी कंपनीने एफपीओची ऑफर जाहीर केल्यानंतर दिलेल्या मुदतीत यासाठी नोंदणी करणे गरजेचे असते. नोंदणी केल्यानंतर लॉटनुसार गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा होतात.