उन्हाळा तर आता सरला असून पावसाळा सुरू झाला आहे. मात्र ही परिस्थिती तर भारतातली आहे. नुकतीच एसीची (Air conditioner) एक नवी आवृत्ती लॉन्च झाली आहे. कंबरेवरच्या एसीची... होय. या नव्या तंत्रज्ञानामुळे शरीर थंड राहण्यास मोठी मदत होणार आहे. टोकियो स्थित गॅझेट कंपनी ग्लोचरनं (Gloture) हे भन्नाट उपकरण लान्च केलं आहे. या उपकरणाचं नाव आहे विअरकूल (Wearcool). हे प्रॉडक्ट घराबाहेर काम करणाऱ्यांसाठी, कडक उन्हात कष्ट घेणाऱ्या लोकांसाठी विअरकूल हा एक चांगला पर्याय ठरणार आहे.
Table of contents [Show]
ग्लोचर विअरकूलची वैशिष्ट्ये
विअरकूल हे एका पट्ट्यासारखे आहे. ज्याप्रमाणे आपला कंबरपट्टा असतो, तसाच याचा लूक आहे. कोणत्याही शाळा-कॉलेजात जाणारे मूल किंवा कडक उन्हात बाहेर पडणारे लोक हा परिधान करू शकतात. हे एक फिटनेस प्रॉडक्ट आहे. शरीराच्या वरच्या भागाला थंड ठेवण्याचं काम या डिव्हाइसच्या माध्यमातून होतं.
पोर्टेबल डिव्हाइस
हे एक पोर्टेबल डिव्हाइस आहे. हा एअर बेल्ट उष्णता शोषणाऱ्या फेज चेंज मटेरियलपासून बनलेला आहे. त्यात अनेक छोटे पंखे आहेत, ज्यांचे व्हेंट्स वरच्या बाजूला आहेत. या व्हेंट्समधून ताजी अन् शुद्ध अशी हवा बाहेर येते. या एअर बेल्टचं वजन फक्त 488 ग्रॅम आहे. विअर कूल या उपकरणाचा हवेचा वेग 5 मीटर प्रति सेकंद आहे. यामुळे थंडीचा अत्यंत चांगला असा अनुभव तुम्हाला मिळतो.
ग्लोचर विअर कूलची इतर वैशिष्ट्ये
हे डिव्हाइस तुम्ही मोबाइल अॅपवरून कंट्रोल करू शकता. अॅपवरून म्हणजे तुम्ही हवेच्या प्रवाहापासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्वकाही कमी आणि जास्त करू शकता. याचं अॅप जपानी आणि इंग्रजी भाषेला सपोर्ट करतं.
बॅटरी किती?
विअर कूल कमाल 17 तासांची बॅटरी लाइफ देतं. म्हणजे एका चार्जमध्ये एक दिवस याचा व्यवस्थित वापर करता येवू शकतो. समजा तुम्हाला रात्री जास्त उकाडा जाणवत असेल तर हे कंबरेला लावून शांत झोपू शकता. याची वेस्ट साइझ 70 ते 105 सें.मी. इथपर्यंत अॅडजस्ट होऊ शकते.
भारताता येणार?
ग्लोचर शॉपवरून विअर कूल (Wear Cool) ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. याची किंमत 235 डॉलर म्हणजे सुमारे 19 हजार रुपये इतकी आहे. सध्या या उपकरणाची उपलब्धता जपान देशात आहे. भारतात अद्याप ते लॉन्च झालेलं नाही. मात्र वातावरणाचा विचार करता भारतात याची अधिक गरज आहे. भारतासारख्या देशासाठी 19,000 ही किंमत खूप जास्त आहे. मात्र, दुसरीकडे हे तंत्रज्ञानदेखील प्राथमिक अवस्थेतच आहे. याची सुरुवात जपानमधून झाली आहे. त्यामुळे भारतात लॉन्च होईल, त्यावेळी भारतीयांना परवडेल, अशात किंमतीत ते लॉन्च केलं जाऊ शकतं.