Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhar : युआयडीएआयने आधार पडताळणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

Aadhar Card

Image Source : www.deccanherald.com

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI - Unique Identification Authority of India) ने ऑनलाइन पडताळणीच्या कामात सहभागी असलेल्या युनिट्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. ते कोणते? ते पाहूया.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI - Unique Identification Authority of India) ने म्हटले आहे की, आधार पडताळणीपूर्वी, युनिट्सना संपूर्ण गोष्ट स्पष्ट केल्यानंतर कागदावर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संबंधित लोकांची संमती घ्यावी लागेल. ऑनलाइन पडताळणीच्या कामात सहभागी असलेल्या युनिट्ससाठी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्राधिकरणाने हे सांगितले आहे. यासोबतच लोकांकडून जो डेटा घेतला जातो, त्यांना त्याची चांगली माहिती असणे आणि आधार पडताळणीचा उद्देश काय आहे? याचीही खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युआयडीएआयने काय म्हटले?

युआयडीएआयने म्हटले आहे की, पडताळणी युनिट्सनी लोकांना संपूर्ण गोष्ट समजावून सांगणे आणि आधार पडताळणीबाबत त्यांची संमती घेणे आवश्यक आहे. प्राधिकरणाच्या मते, घेतलेल्या संमतीच्या पडताळणीशी संबंधित कागदपत्रे आणि गोष्टी, नियमानुसार विहित केलेल्या मर्यादेपर्यंत ठेवल्या पाहिजेत. "आणि ही मुदत संपल्यानंतर ज्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत त्या कायद्यानुसार केल्या जाऊ शकतात," युआयडीएआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

आधार क्रमांकाच्या सुरक्षिततेबद्दल खात्री द्या

प्रसिद्धीपत्रका नुसार, "यूआयडीएआयने असेही म्हटले आहे की पडताळणी युनिट्स लोकांशी विनम्र असले पाहिजेत आणि त्यांनी संबंधित लोकांना आधार क्रमांकाच्या सुरक्षिततेबद्दल आणि गोपनीयतेची खात्री दिली पाहिजे." युआयडीएआयने युनिट्सना हेसुद्धा सांगितले आहे की, आधार क्रमांक तेव्हाच संग्रहित करा जेव्हा ते तसे करण्यास अधिकृत असतील. आणि जर त्यांना ते करायचे असेल तर ते विहित नियमानुसार करतील.

पुरावा नसतानाही आधार अपडेट करा

आधार कार्ड धारकांसाठी UIDAI ने एक नवीन सेवा आणली आहे. तुमच्याजवळ जर तुमच्या नावाचे एकही कागदपत्र किंवा पुरावा नसेल तरीही तुम्ही तुमचे आधार अपडेट करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या परिवारातील प्रमुखाची (Head of Family-HOF) परवानगी घ्यावी लागणार आहे. आपल्या समाजात असेही लोक आहेत; ज्यांच्याजवळ काहीच अधिकृत कागदपत्रे किंवा पुरावे नसतात. त्यामुळे अशा व्यक्तींना आधारसाठी नाव नोंदवताना किंवा आधारमधील माहिती अपडेट करताना अडचण येते. कारण त्यांच्याकडे पुरावा म्हणून अधिकृत अशी कागदपत्रे नसतात. आधारने यावर उपाय म्हणून ‘हेड ऑफ फॅमिली’च्या बेसवर कुटुंबातील इतर सदस्यांना आधारमधील माहिती अपटेड करण्याची परवानगी दिली आहे. आधारच्या या नवीन पर्यायाचा वापर करून कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मदतीने कोणीही आपल्या आधारकार्डवरील माहिती अपडेट करू शकतो.