आधार कार्ड (Aadhaar Card) हा प्रत्येक सरकारी कामकाजामध्ये उपयोगाचे डॉक्युमेंट आहे. सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व ठिकाणी आधारकार्ड देणे बंधनकारक आहे. म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड बंधनकारक आहे. सरकारी प्रमाणेच खासगी कामांसाठीही आधार कार्ड गरजेचे असते. पण आधारकार्डबाबतीत फसवणूकीच्या घटनाही घडू शकतात. आजकाल युआयडीएआय (UIDAI) च्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सरकारने आधार कार्ड (Aadhar Card) वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या मेसेजमागील खरं काय? ते पाहूया.
युआयडीएआयच्या नावाने व्हायरल झालेला मेसेज
युआयडीएआय (UIDAI) च्या नावाने व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की सरकारने आधार वापरकर्त्यांसाठी त्यांची आधारशी संबंधित माहिती कोणाशीही शेअर करू नये असा सल्ला दिला आहे. यासोबतच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची प्रत कोणाशीही शेअर करू नका. यासोबतच कोणत्याही कामासाठी आधार कार्डची प्रत देण्याची गरज नाही. आधारचा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा आदेश जारी केला आहे.
सरकारने खरोखरच काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत का?
हा मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मेसेजच्या आधारे आधार जारी करणारी संस्था युआयडीएआय (UIDAI)ने हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असल्याची माहिती दिली आहे. ही बातमी अजिबात खरी नाही. केंद्र सरकारने असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही. यासोबतच युआयडीएआय (UIDAI)च्या लिंकचाही परिपत्रकात चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. आधारशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी तुम्ही uidai.gov.in ला भेट द्या.
आधार कार्ड हरविले किंवा चोरीला गेले तर तुमचे बॅंक खाते पूर्ण रिकामे होते?
कोणतेही शासकीय काम असो या खासगी काम पुरावा म्हणून आधार कार्डचा आधार तर लागतोच. म्हणूनच आधार कार्ड (Aadhaar Card) सांभाळून ठेवणे, ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण आधार कार्ड हरविले या चोरीला गेले तर तुमचे बॅंक खाते पूर्ण रिकामे होण्याची शक्यता आहे का? तर भारतात प्रत्येक नागरिककडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. पण समजा जर आधार कार्ड हरविले तर बॅंक खाते रिकामे होऊ शकते का? हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात फिरत असतो. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर मिळते. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ज्याप्रमाणे बॅंक खात्याचा नंबर माहिती असूनही मूळ मालकाशिवाय इतर कोणी व्यक्ती त्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. त्याचप्रमाणे आधार कार्डचा नंबर माहिती असूनदेखील इतर कोणालाही तुमच्या खात्यातून पैसे काढता येणार नाही. त्यामुळे बॅंक खाते रिकामे होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.