Can Aadhaar Card Number Make Bank Account Empty: कोणतेही शासकीय काम असो या खासगी काम पुरावा म्हणून आधार कार्डचा आधार तर लागतोच. म्हणूनच आधार कार्ड (Aadhaar Card) सांभाळून ठेवणे, ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण आधार कार्ड हरविले या चोरीला गेले तर तुमचे बॅंक खाते पूर्ण रिकामे होण्याची शक्यता आहे का? याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.
UIDAI चा नियम काय सांगतो? (What Does The UIDAI Rule Say)
भारतात प्रत्येक नागरिककडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच आधार कार्ड हे बॅंक खात्याशी लिंक असते. त्यामुळे जर आधार कार्ड हरविले तर बॅंक खाते रिकामे होऊ शकते का? हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात फिरत असतो. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्षात UIDAI ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिले आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना UIDAI म्हणते की, जसे बॅंक खातेचा नंबर माहिती असला, तरी मुळ मालकाशिवाय इतर व्यक्ती त्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. तसेच आधार कार्डचा नंबर माहिती असूनदेखील इतर कोणतीही व्यक्ती तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. त्यामुळे बॅंक खाते रिकामे होण्याचा प्रश्नच नाही.
फक्त आधार कार्डने फसवणूक होत नाही (Aadhaar Card is Not the Only Fraud)
कधी ही बॅंक खाते संबंधी फसवणूक ही आधार कार्डमुळेच होत नाही. त्याला इतर गोष्टी कारणीभूत असतात. जसे की, सायबर गुन्हा. या सायबर गुन्हयामध्ये मोठी रक्कमची आमिष दाखवितात किंवा कार्ड ब्लाक करू अशी धमकी देऊन वैयक्तिक माहिती काढून घेतात. यामध्ये जन्मतारीख, पॅन कार्ड, ओटीपी व पासवर्डचा समावेश असतो. त्यामुळे या सर्व माहितीमुळे बॅंकेसंबंधी मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती कधी ही शेयर करू नये. आणखी एक म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा की, बॅंकेची अधिकाऱ्यांकडे तुमची वैयक्तिक माहिती असते, ते कर्मचारी तुम्हाला कधीच वैयक्तिक माहिती विचारत नाही.