Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD Rate Hike: एएए रेटींग असलेली ही फायनॅन्स कंपनी एफडीवर किती व्याजदर देते?

AAA rated company's FD interest rates hikes

AAA rated company's FD interest rates hikes: भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी एफडीचे व्याजदर वाढवले ​​आहेत. छोट्या बँका आणि फायनान्स कंपन्या एफडीवर अधिक व्याज देत आहेत, तर ही एएए रेटींग असलेली फायनॅन्स कंपनी नेमके किती व्याज देते ते पुढे वाचा.

This company with AAA rating will give more interest on FD than banks: आयसीआयसीआय हाउसिंग फायनॅन्स (ICICI HFC) कंपनीने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात (FD Interest Rate Hike) वाढ केली आहे. नवीन व्याजदर 3 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. आयसीआयसीआय हाउसिंग फायनॅन्सला (ICICI HFC) CRISIL, ICRA आणि CARE (या भारताचे क्रेडिट रेटिंग आणि माहिती सेवा देतात) यांनी एएए (AAA) रेटींग  दिले आहे. याचा अर्थ, कंपनीच्या मुदत ठेवीत गुंतवलेले पैसे सुरक्षित आहेत. कंपनी संकलित आणि असंकलित (Cumulative and non-cumulative) एफडी ऑफर करते. कंपनी सध्या संकलित एफडीवर 7.50 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. तर असंकलित एफडीवर दरमहा कमाल 7.25 टक्के दराने व्याज देत आहे.

संकलित पर्यायांतर्गत, आयसीआयसीआय हाउसिंग फायनॅन्स 12 ते 24 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर 7 टक्के, 24 ते 36 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर 7.30 टक्के आणि 36 ते 48 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर 7.40 टक्के व्याज देते. त्याचप्रमाणे, आता कंपनी 48 ते 120 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 7.50 टक्के व्याज देणार आहे.

7.30 टक्के व्याज मिळेल (7.30 percent interest will be earned)-

कंपनीने असंकलित एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे. कंपनी आता 12 ते 24 महिन्यांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर दरमहा 6.80 टक्के दराने व्याज देत आहे. दुसरीकडे, 24 ते 36 महिन्यांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर 7.05 टक्के, 36 ते 48 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 7.15 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 7.25 टक्के मासिक व्याज आता ग्राहकांना उपलब्ध आहे.

या मुदत ठेवींवर मिळेल अधिक व्याज (These fixed deposits will earn more interest)-

कंपनीने 12 ते 24 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर तिमाही दराने 6.85 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना आता 24 ते 36 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 7.10 टक्के, 36 ते 48 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 7.20 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 7.30 टक्के दराने व्याज मिळेल. या अंतर्गत, आयसीआयसीआय हाउसिंग फायनॅन्सने आता 12 ते 24 महिन्यांत परिपक्व होणार्‍या असंकलित एफडीवर वार्षिक 7 टक्के दराने व्याज देईल. 24 ते 36 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 7.30 टक्के वार्षिक, 36 ते 48 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 7.40 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर वार्षिक 7.50 टक्के व्याज दिले जाईल.