Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger Stocks : गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारा शेअर, 2 वर्षात 400 टक्क्यांचा बंपर परतावा...

Multibagger Stocks : गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारा शेअर, 2 वर्षात 400 टक्क्यांचा बंपर परतावा...

Image Source : www.livemint.com

Multibagger Stocks : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असताना गुंतवणूकदाराला बंपर परताव्याची अपेक्षा असते. आता एक असा शेअर ज्यानं मागच्या दोन वर्षांत बंपर असा परतावा दिला आहे. 20 टक्के, 40 टक्के किंवा 50 टक्के नाही, तर त्याहूनही कितीतरी अधिक परतावा या शेअरनं दिला आहे.

पैसे दुप्पट करण्याच्या अनेक योजना आहेत. मात्र कित्तेक पटींनी परतावा (Return)  हवा असेल तर उत्तम परतावा देणारे शेअर शोधणं गरजेचं आहे. एक शेअर असा आहे, ज्यानं बंपर असा परतावा दिला आहे. आज आपण अशाच एका शेअरबद्दल बोलणार आहोत, ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. पॅकेज्ड फूड्स उद्योगाशी संबंधित मिश्तान फूड्स  (Mishtann Foods share) या कंपनीच्या शेअरबद्दल आपण चर्चा करत आहोत. हा स्मॉल कॅप समभागांपैकी एक आहे. या समभागानं गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा कित्तेक पटींनी परतावा दिला आहे. कोविडनंतर या स्टॉकमध्ये खूप चांगली रिकव्हरी झाली आहे.

फक्त 2 महिन्यांत 60 टक्के परतावा

हा स्मॉल कॅप स्टॉक केवळ 2 वर्षांत 2.20 रुपयांवरून 11.30 रुपयांपर्यंत वधारला आहे. अशाप्रकारे, या समभागानं दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. मे 2023च्या शेवटच्या आठवड्यात तो 7.15 रुपयांच्या खाली आला. तेव्हापासून त्यात बुल ट्रेंड पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (14 जुलै), आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी, मिष्टान फूड्सचे शेअर्स बीएसईवर 0.09 टक्क्यांनी किंवा 0.01 रुपयांनी 11.11 रुपयांवर बंद झाले. याचा अर्थ केवळ 2 महिन्यांत स्टॉक 60 टक्क्यांनी वाढला आहे.

काय करते कंपनी?

मिष्ठान फूड्स बासमती तांदूळ, डाळ, मसाले आणि गव्हाच्या व्यापाराशी संबंधित कंपनी आहे. कंपनीतर्फे मार्केटमध्ये विविध उत्पादनं आणली जात आहेत. कंपनी सैंधव मीठ, आयोडाइज्ड मीठ आणण्याचीदेखील तयारी करत आहे. मिष्ठान फूड्स नॉर्थ इस्टमध्ये आपला व्यवसाय वाढवणार आहे. कंपनीचा अहमदाबादच्या जवळ तांदळावर प्रक्रिया करण्याचं यूनिट आहे.

नोमुरा सिंगापूरचा हिस्सा वाढला

निष्ठान फूड्समध्ये नोमुरा सिंगापूरची हिस्सेदारी आहे. ती आता वाढवण्यात आली आहे. नोमुरा सिंगापूरजवळ मिष्ठान फूड्सचे 1,28,25,854चे शेअर आहेत. ही 1.28 टक्के इतकी आहे. मिष्ठान फूड्सचा शेअर 3 ऑगस्ट 2018ला बीएसईवर 1.50 रुपये इतका होता.