मणिपाल हॉस्पिटल ही भारतातील महत्वाची अशी हॉस्पिटल चेन आहे. आता ही हॉस्पिटल चेन सिंगापूरच्या एका मोठ्या कंपनीद्वारे खरेदी केली जाणार आहे.सिंगापूरमधील गुंतवणूक फर्म टेमासेक (Temasek) ने मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेसमधील मोठा भाग खरेदी केला आहे. बेंगळुरूस्थित मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेसचे अतिरिक्त 41% शेअर 16,300 कोटी रुपयांना ($2 अब्ज) टेमासेकने विकत घेत असल्याची घोषणा केली आहे.
आता मणिपाल हेल्थमध्ये टेमासेकची 59 टक्के भागीदारी असेल हे स्पष्ट झाले आहे. टेमासेक आणि मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस या दोन्ही कंपन्यांनी सोमवारी एक संयुक्त निवेदन जरी केले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की टेमासेक खाजगी इक्विटी कंपनी (Temasek Holdings ) आणि मणिपालचे संस्थापक रंजन पै (Ranjan Pai) यांच्या कुटुंबाकडून भागभांडवल खरेदी करणार आहे. याबाबतचा व्यवहार पूर्ण झाला असून केवळ औपचारिकता बाकी असल्याची माहिती देखील दिली गेली आहे.
आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वात मोठी डील!
मीडिया रिपोर्ट्सनुसार,ही डील किती रुपयांत ठरली हे स्पष्ट केलेलं नाही. परंतु माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ,टेमासेक मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेसमधील 41 टक्के भागीदारी 16,300 कोटी रुपयांहून अधिक किमतीत खरेदी करणार आहे. आतापर्यंतची आरोग्य सेवा क्षेत्रातील ही सर्वात मोठी डील असेल असे देखील म्हटले जात आहे. मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेसचे सध्याचे मूल्यांकन (Valuation) सुमारे 40,000 कोटी रुपये इतके आहे.
या व्यवहारानंतर मणिपालचे संस्थापक रंजन पै आणि त्यांच्या कुटुंबियांची कंपनीतील हिस्सेदारी 50% वरून 30 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे.
Why did the promoter family of Manipal Hospitals led by Dr Ranjan Pai decide to cede control? Here's what he told @ashwinmohansays
— Moneycontrol (@moneycontrolcom) April 10, 2023
Read more from the exclusive interview ?https://t.co/nfb481alqB#ManipalHospitals pic.twitter.com/mUFSzG8GRm
मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस देशातील वेगवगेळ्या 16 शहरांमध्ये 29 रुग्णालयांची साखळी चालवते. सर्व रुग्णालयांतील खाटांची संख्या सुमारे 8,300 इतकी आहे. आद्ययावत उपचारांसाठी हे हॉस्पिटल ओळखले जाते.
एका वर्षात सुमारे 50 लाख रुग्णांना मणिपाल रुग्णालय सुविधा पुरविते.
मणिपाल समुहाचे अध्यक्ष रंजन पै यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, टेमासेक ही आघाडीची गुंतवणूक कंपनी मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेसमध्ये महत्त्वपूर्ण भागभांडवल विकत घेत असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. येणाऱ्या काळात अधिक जोमाने आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेसह आम्ही नागरिकांना सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करू अये देखील त्यांनी म्हटले आहे.
National Investment and Infrastructure Fund (NIIF) म्हणजेच नॅशनल इन्वेस्टमेंट एंड इंफ्रास्ट्रक्चर फंडमधील असलेला मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेसचा हिस्सा देखील टेमासेकला विकला जाणार आहे.
Source: https://rb.gy/o0781