Post Office Scheme: केंद्र सरकारच्यावतीने पोस्ट ऑफिसकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याबरोबरच सरकारी सुक्षितता आणि टॅक्समध्ये सवलदेखील मिळत आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या योजनांवर वर्षाला साधारण 8 टक्क्यांपर्यंत परतावा आणि टॅक्समध्ये सवलत मिळू शकते.
तुम्ही जर बचत आणि गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्टाच्या विविध बचत योजनांचा लाभ घेऊ शकता. या योजना सरकारद्वारे चालविल्या जात असल्यामुळे यामधील जोखीम खूपच कमी असते आणि त्यावर मिळणारा परतावा हा शाश्वत असतो. पोस्टाच्या विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. यातील काही योजनांवर साधारण 8 टक्क्यांपर्यंत परतावा दिला जातो. याचा गुंतवणूकदारांना नक्कीच फायदा घेता येईल. आज आपण अशाच दोन योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यातून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याबरोबरच टॅक्स सवलत देखील मिळू शकते.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)
पोस्ट ऑफिसद्वारे मुलींकरीता सुकन्या समृ्द्धी योजना राबवली जाते. पोस्टाच्या विविध योजनांपैकी ही सर्वाधिक व्याजदर देणारी योजना आहे. सध्या या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना वर्षाला 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये किमान 250 रुपयांपासून खाते सुरू करता येते आणि जास्तीत जास्त 1.50 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षांचा आहे. तसेच सुकन्या समृ्द्धी योजनेवर इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80 अंतर्गत टॅक्समध्ये कर सवलतदेखील मिळते.
सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम (Senior Citizen Saving Scheme-SCSS)
पोस्ट ऑफिसने ज्येष्ठ नागरिकांना नजरेसमोर ठेवून सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम सुरू केली आहे. या योजनेमध्ये 55 ते 60 वर्षाच्या नागरिकांना गुंतवणूक करता येते. यामध्ये किमान 1000 रुपयांपासून खाते सुरू करता येते. तर जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज मिळत आहे. तसेच या योजनेवर कलम 80C अंतर्गत कर सवलतदेखील मिळते.