Pradhan Mantri Mudra Loan: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod`i) यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी माहिती घेऊ. या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना 10 लाखापर्यंतचे कर्ज मिळत आहे. लहान उदयोगांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा मुळ हेतू आहे. या योजनेसंबंधित अधिक जाणून घेवुयात.
प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे?
शासनाने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या फायदयासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनेचा फायदादेखील मोठया प्रमाणात घेतला जात आहे. एप्रिल 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत बिगर- कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु किंवा सूक्ष्म उद्योगांना 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहेत.
कर्जाची रक्कम
प्रधानमंत्री मुद्रा योजनेव्दारे दिल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम ही तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये 'बाल', 'किशोर' आणि 'तरुण' यांचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही श्रेणींमध्ये कर्जाची रक्कम ही वेगवेगळी दिली जाते. बाल अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते, तर किशोर अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आणि तरुण श्रेणी अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते.
कर्जासाठी अर्ज कसा करायचा
प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज पाहिजे असेल, तर तुम्हाला हे कर्ज कमर्शियल बँक, आरआरबी, स्मॉल फायनान्स बँक, एमएफआय, एनबीएफसी या बॅंकाव्दारे मिळेल. ज्या लोकांना कर्ज पाहिजे असेल, त्यांनी थेट या बँकांशी संपर्क साधा किंवा www.udyamimitra.in वर जाऊन अर्ज करा.