Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Best Policy: जाणून घ्या, LIC मध्ये दररोज फक्त 80 रू. गुंतवणूकीने मिळेल 10 लाख रूपये

LIC Best Policy

Image Source : http://www.business-standard.com/

LIC New Policy: LIC नेहमीच ग्राहकांच्या भविष्यासाठी चांगल्या नियोजनाचे प्लॅनिंग करीत असते. यासाठी एलआयसी सातत्याने ग्राहकांसाठी विविध पॉलिसी ऑफर करत असते. या पॉलिसी ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. अशी एक पॉलिसी पाहूयात, जी फक्त 80 रू. गुंतवणूकीने 10 लाख रूपये मिळवून देईन.

LIC Jeevan Anand Policy: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) सातत्याने ग्राहकांच्या भविष्याचा विचार करीत असते. ग्राहकांचे जीवन सुरक्षित रहावे, यासाठी बाजारात विविध पॉलिसी आणते. जेणेकरून ग्राहकांना छोटी गुंतवणूक करून, मोठी निधी उभारण्याची संधी मिळेल. अशीच एक पॉलिसी आहे, ज्याचे नाव ‘जीवन आनंद पॉलिसी’ असे आहे. जी फक्त 80 रूपयांची गुतंवणूक करून 10 लाखाचा निधी जमा करण्याची संधी देते. या मोठया फायद्यासह दुप्पट बोनसचादेखील लाभ मिळतो. या पॉलिसीबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

काय आहे पात्रता (What is the Eligibility)

जीवन आनंद पॉलिसी या LIC (Life Insurance Corporation of India) योजनेमध्ये तुम्हाला दररोज फक्त 80 रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. या पॉलिसीमध्ये 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेली व्यक्तीच गुंतवणूक करू शकते. तसेच तुम्हाला या पॉलिसीमध्ये प्रीमियम म्हणून 27,000 रूपये भरावे लागणार. म्हणजेच एकूण पाहता, तुम्हाला दर महिन्याला यामध्ये 2300 रूपये प्रीमियम भरावा लागेल. या आकडयांचा हिशोब लावता, साधारण तुम्हाला दररोज 80 रूपयांची बचत करून ती या पॉलिसीमध्ये गुंतवावे लागतील. जेणेकरून तुम्ही 21 वर्षात 5.60 लाख रूपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 10 लाख रूपये मिळतील. 

जीवन आनंद पॉलिसीचे फायदे (Benefits of Jeevan Anand Policy)

जीवन आनंद पॉलिसी या एलआयसीच्या योजनेमध्ये मॅच्युरिटीवर परतावा म्हणून एक निश्चित रक्कम प्राप्त होते. जर तुम्ही जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला म्हणजेच गुंतवणूकदारांना 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा आणि 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनल बोनस मिळतो. महत्वाचे म्हणजे, तुमचा नफा दुप्पट करण्यासाठी, तुम्हाला 15 वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे असते. जेणेकरून तुम्हाला बोनस दुप्पट करण्याचा अधिकार प्राप्त होतो. एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यू, अपंगत्व, मुदतीची हमी आणि गंभीर आजार या गोष्टींसाठी विमा संरक्षणदेखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, विम्याच्या रकमेच्या 125 टक्के रक्कम नॉमिनीला मिळतो. या सर्व गोष्टी पाहता, तुम्हाला एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीव्दारे कमी गुंतवणूकीत अधिक फायदा होणार आहे, हे निश्चित.