UPSC Scholarship: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे 50 हजार रुपयांची अर्थसहाय्य शिष्यवृत्ती (Scholarship) दिली जाते.
महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती)तर्फे ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत युपीएससीच्या (UPSC) मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी 50 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै, 2023 आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना इतर सरकारी संस्था किंवा सारथी, पुणे यांच्याकडून अर्थसहाय्य मिळत असेल तर ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
शिष्यवृत्तीसाठी पात्रता काय?
- उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- उमेदवार नॉन-क्रिमिलेअर गटात मोडणारा असावा.
- उमेदवार OBC, NJNT आणि SBC प्रवर्गातील असावा.
- सदर विद्यार्थी हा 12 जून 2023 च्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक
- आधारकार्ड
- रहिवासी दाखला
- जात प्रमाणपत्र
- नॉल-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
- पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र
- बँक खात्याची माहिती
- पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत
महाज्योती काय आहे?
महाज्योती (महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) हा राज्य सरकारतर्फे राबविला जाणारा उपक्रम आहे. जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), आणि विशेष मागास वर्गातील (SBC) घटकांसाठी विविध योजना राबवणारी संस्था आहे. या संस्थेद्वारे गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टायपेंड, शिष्यवृत्ती, फेलोशिप अनुदान दिले जाते.
संबंधित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह महाज्योती संस्थेच्या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै, 2023 आहे.