Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Abroad Studies Scholarship: इंजिनिअरिंग पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 5 लाखांची डी के भावे शिष्यवृत्ती

D. K. Bhave Scholarship for Engineering and Technology

Abroad Studies Scholarship: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर शिक्षणासाठी 5 लाखांची स्कॉलरशिप दिली जाते. सिव्हिल इंजिनिअर डी के बावे यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते.

Abroad Studies Scholarship: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या आणि परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना 5 लाखांची स्कॉलरशिप दिली जाते. पेशाने सिव्हिल इंजिनिअर असलेले कै. डी के भावे यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते.

कोण होते डी के भावे!

डी. के. भावे म्हणजेच दामोदर कृष्णा भावे हे मूळचे मिरज येथील रहिवाशी होते. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. तरीही त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता. त्यांनी फग्युसन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षण इंग्लंडमधून पूर्ण केले होते. त्यांना इतरांनीही असेच परदेशात उच्च शिक्षण घ्यावे असे वाटायचे. यासाठी त्यांनी 1950 मध्ये अभियांत्रिकीच्या पदवीनंतरच्या शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती सुरू केली होती. आजही ही शिष्यवृत्ती सुरू असून, पात्र विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीद्वारे 5 लाख रुपयांची मदत पुरवली जाते.

शिष्यवृत्ती फक्त अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि इंग्लंडसाठी

डी के भावे यांच्या नावाने देण्यात येणारी 5 लाखांची शिष्यवृत्ती ही अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाच दिली जाते. आजच्या वातावरणाशी जुळवून घेत भावे यांच्या मुलांनी या शिष्यवृत्तीची पुनर्रचना करून ती अमेरिका/कॅनडा/जर्मनी आणि इंग्लंडमधील इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.

डी के भावे शिष्यवृत्तीसाठी पात्रता व अटी काय आहेत?

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुणे महानगर पालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिका क्षेत्रातील कॉलेजमधून पदवीधर झालेला विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे.
  • तसेच पुणे विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शेवटच्या  वर्षातील शिक्षण घेणारा विद्यार्थी यासाठी पात्र आहे.
  • संबंधित उमेदवाराने अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि इंग्लंडमधील कोणत्याही परदेशी मान्यताप्राप्त विद्यापीठात इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
  • वरील देशांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला स्पर्धा करण्यास मदत करणे, हा यामागचा उद्देश आहे.
  • या शिष्यवृत्तीसाठी आधीच परदेशात शिकण्यासाठी गेलेले विद्यार्थी पात्र नाहीत.


अर्ज करण्याची शेवटची तारीख

डी के भावे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे, 2023 आहे.

आवश्यक कागदपत्रे काय लागतात?

  • शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध करून दिलेला अर्ज
  • कॉलेजच्या प्राचार्यांचे शिफारस पत्र
  • इंजिनिअरिंगच्या फायनल इअरची मार्कलिस्ट
  • पासपोर्ट आणि आधारकार्डची प्रत
  • परदेशात अॅडमिशन मिळालेल्या पत्राची प्रत
  • आय-20 फॉर्म (उपलब्ध असल्यास)


या शिष्यवृत्तीविषयी अधिक माहिती हवी असल्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेस्थळावर उपलब्ध आहे. तसेच याच वेबसाईटवरून विद्यार्थी ऑनलाईन अर्ज पाठवू शकतात.