Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Female Entrepreneurs: भारतातील प्रेरणादायी महिला उद्योजक; आपल्या क्षेत्रात निर्माण केले बेंचमार्क

Successful Female Entrepreneurs

Female Entrepreneurs: भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील सातत्यपूर्ण घडामोडींमुळे, अधिकाधिक महिला उद्योजक स्वप्नांचा पाठलाग करत आहेत आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये भरभराट करत आहेत. आम्ही तुमच्यासाठी अशा भारतीय महिलांचा प्रवास घेऊन आलो आहोत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर करताना एक टिप्पणी केली होती की, "नारी शक्ती ही आपल्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे.” त्यानुसार वैयक्तिक संघर्ष आणि आव्हानांचा समावेश असतानाही त्यांच्या वैयक्तिक यशोगाथांद्वारे या कष्टाळू महिला इतर महिलांना उद्योजकतेच्या मार्गावर जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. परिणामी, भारत सरकारच्या ठोस पाठिंब्यासह स्टार्टअपमध्ये भारत सातत्याने क्रमवारीत वर जात आहे. 

भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील सातत्यपूर्ण घडामोडींमुळे, अधिकाधिक महिला उद्योजक स्वप्नांचा पाठलाग करत आहेत आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये भरभराट करत आहेत. आम्ही तुमच्यासाठी अशा भारतीय महिलांचा प्रवास घेऊन आलो आहोत. ज्यांनी त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात बेंचमार्क सेट केले आहे. पण या महिला उद्योजकांचा इथपर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. त्यांना हा डोलारा उभा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

महिला उद्योजकांना अनेक अनोख्या आव्हानांना तोंड द्यावे लागत असते. ही आव्हाने वैयक्तिक व आर्थिक गोष्टींपेक्षा लिंगभेद आणि सामाजिक दडपणाची खूप आहेत. अनेक क्षेत्रांत पुरुषांची मक्तेदारी असल्याने महिला उद्योजकांना तिथे स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. आज आपण भारतातील अशाच काही मेहनती महिला आणि त्यांनी सुरू केलेल्या स्टार्टअपविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अंकिता गाबा (Founder: Social Samosa)

अंकिता गाबा एक सल्लागार, व्याख्याता, उद्योजक आणि मीडिया स्ट्रॅटेजिस्ट आहे. जी तिच्या मल्टीटास्किंगसाठी ओळखली जाते. तिने 2011 मध्ये सोशल समोसाची (Social Samosa) स्थापना केली होती. मात्र तिने 2015 मध्ये दुसरा उपक्रम सुरू करण्यासाठी ही कंपनी सोडली. अंकिता गाबा मूळची मुंबईची आहे. तिने 2013 मध्ये वॅट अवॉर्ड्सद्वारे " Social Media Entrepreneur of the Year Award" जिंकला. तिचा पहिला उपक्रम सुपरचूहा (SUPERCHUHA) हा भारतातील पहिल्या सोशल मीडिया एजन्सीपैकी एक होता.

गरिमा सतीजा (Founder: PoshVine)

गरिमा सतीजा यांनी पॉशविनची स्थापना केली. PoshVine सुरू करण्यापूर्वी गरिमाने Naukri.com आणि Ozone मीडियासोबत काम केले. PoshVine हे एक ऑनलाईन पोर्टल आहे; जे लोकांना जेवणाचे आणि प्रवासाचे वेगवेगळा पर्याय शोधण्यासाठी आणि बुक करण्यासाठी मदत करते. PoshVineची सुरुवात प्रीमियम रेस्टॉरंट्सपासून सुरू झाली. PoshVineवर वैयक्तिक आणि कंपन्यांना हवे त्यानुसार ते वेगवेगळी पॅकेजेस तयार करून देतात. PoshVine ने अलीकडेच त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये B2B चा समावेश केला आहे. त्यांनी एचडीएफसी बँक, सिटी बँक, जॅग्वार इत्यादी मोठ्या कंपन्यांसोबत काम सुरू केले.

अर्पिता गणेश (Founder: Buttercups)

अर्पिता गणेश हिने आपला एक वेगळाच इनर वेअर ब्रॅण्ड तयार केला आहे. त्यामुळे ती 'इंडियन ब्रा लेडी' म्हणून ही ओळखली जाते. अर्पिताने या व्यवसायात उतरण्यापूर्वी महिलांना परवडतील अशी इनर वेअर, त्यांचे योग्य फिटिंग, स्टाईल आणि रंग यांचा अभ्यास केला. तसेच अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये ब्रा-फिटिंगचा कोर्स केल्यानंतर इंडियन मार्केटमध्ये महिलांची इनर वेअर बाजारात आणली. यासाठी अर्पिताने जाहिरात क्षेत्रातील स्वत:ची 10 वर्षांची कारकीर्द सोडली. तिने 2008 मध्ये ‘बटरकप’ची (Buttercups) स्थापना केली. हा भारतातील पहिला इनर वेअर ब्रँड आहे; जो आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रॅण्डमध्ये असलेल्या गोष्टी देतो.

मेघा मलिक (Founder: DesignerPeople)

मेघा मलिकने दशकभरापूर्वी डिझायनरपीपल सुरू करून उद्योजक म्हणून तिचा प्रवास सुरू केला. उत्पादनांचे पॅकेजिंग, डिझायनिंग आणि त्याचे पोझिशनिंग ग्राहकांना जसे हवे आहे. त्यानुसार त्यात बदल करून देणे, ही तिची खासियत आहे. डिझायनर पीपलमध्ये मेघा क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहते.
तिने गेल्या दहा वर्षांत 500 हून अधिक ब्रँडसोबत काम केले आहे. तसेच त्यांचा ब्रँडिंग पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी मदत केली.

अदिती गुप्ता (Founder: Menstraupedia)

अदिती गुप्ता ही एक सामाजिक उद्योजिका आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण ती मासिक पाळीबद्दल जागरुकता पसरवण्याचे काम करणाऱ्या Menstrupedia ची सह-संस्थापक आहे. भारतातील सर्वात यशस्वी महिला उद्योजकांमध्ये तिची गणना होते. भारतीय समाजात निषिद्ध मानली जाणारी मासिक पाळी, यावर समाजाने वस्तुस्थिती स्वीकारून त्याबद्दल खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे, याकडे तिने लक्ष वेधले आहे. तिच्या कंपनीद्वारे मासिक पाळीबद्दल महिलांमध्ये जनजागृती केली जाते.