Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning for Wedding: लग्नाचे नियोजन करताना 'या' 5 आर्थिक चुका अजिबात करु नका

Financial Planning for Wedding

Image Source : www.smazingevents.com

Financial Planning for Wedding: भारतात लग्न सोहळ्यात लाखो-कोटी रुपये खर्च केले जातात. हा खर्च भागवण्यासाठी बऱ्याच वेळा कर्ज (Loan) घेण्याची वेळ येते. त्यामुळे लग्नाचे नियोजन करताना कोणत्या आर्थिक चुका टाळल्या पाहिजेत, याबद्दल आज माहिती करून घेऊयात.

आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांपैकी एक म्हणजे 'लग्न'(Wedding). लग्नाचा हाच सोहळा साधारण 4 ते 5 दिवस सलग चालतो. ज्याची अनेकजण आतुरतेने वाट पाहतात. लग्न सोहळ्यात लाखो करोडो रुपयांचा खर्च सऱ्हास केला जातो, तो करावाही. मात्र हा खर्च करण्यापूर्वी आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे गरजेचे आहे. अनेकजण वर्षानुवर्ष याच सोहळ्यासाठी बचत करतात. मात्र अतिरिक्त खर्चामुळे बऱ्याच वेळा कर्ज (Loan) घेण्याची वेळ येते. त्यामुळे लग्नाचे नियोजन करताना कोणत्या आर्थिक चुका टाळायला हव्यात, याबद्दल आज माहिती करून घेऊयात.

avoid-these-5-financial-mistakes-while-planning-your-wedding.jpg
लग्नाचे नियोजन करताना 'या' 5 आर्थिक चुका टाळा 

बजेट प्लॅन न करणे

लग्न कार्यात मोठ्या प्रमाणावर खर्च केले जातात. जसे की हॉल बुकिंग, प्री-वेडिंग आणि वेडिंग फोटोग्राफी, लग्नाचे जेवण, डेकोरेशन, मेहंदी इ. गोष्टींवर अमाप पैसे खर्च केले जातात. त्यामुळे कोणताही खर्च करण्यापूर्वी त्याचे बजेट (Wedding Budget) ठरवणे अतिशय गरजेचे आहे. अनेकजण लग्नाचे बजेट ठरवत नाहीत, परिणामाची गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च होतात. ज्याचा फटका पुढे जाऊन आपल्यालाच सहन करावा लागतो. त्यामुळे लग्नापूर्वी होणारा खर्च, लग्नात होणार खर्च आणि लग्नानंतर होणारा खर्च लक्षात घेऊन त्याचे बजेट प्लॅन करणे गरजेचे आहे.

इमर्जन्सी फंडाचा वापर करणे

अनेकजण लग्नाचे बजेट प्लॅन करत नाहीत. त्यामुळे अवाढव्य पैसे लग्न कार्यावर खर्च केले जातात. हा खर्च भरून काढण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतले जाते किंवा इमर्जन्सी फंडातील (Emergency Fund) रकमेचा वापर केला जातो. मुळात इमर्जन्सी फंड हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरला जातो. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक निश्चित गोष्ट समजली जाते. त्यामुळे लग्नासाठी स्वतंत्र निधी उभारणे गरजेचे आहे. इमर्जन्सी फंडातील रकमेचा वापर केल्याने तुम्ही भविष्यातील आर्थिक तरतुदीला धक्का लावत आहात, हे समजणे गरजेचे आहे.

गरजेपेक्षा जास्त पाहुण्यांना आमंत्रित करणे

लग्न हे आयुष्यात एकदाच होत असल्याने अनेकांना ते मोठ्या थाटामाटात साजरे करायचे असते. लग्नाला स्मरणीय बनवण्याचे काम मित्र मैत्रिणी, पाहुणे करतात. परंतु प्रमाणापेक्षा जास्त पाहुण्यांना आमंत्रित केल्याने तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. शहरात किंवा निम शहरात जेवणाच्या प्लेटनुसार चार्जेस पकडले जातात. याशिवाय इतर खर्चही समाविष्ट असतात. त्यामुळे मर्यादित लोकांसोबत लग्नकार्य पार पडल्याने तुमचीही दगदग कमी होईल आणि बजेटही सांभाळले जाईल.

महागड्या कपड्यांवर जास्त खर्च करणे

भारतीय संस्कृतीमध्ये लग्नासाठी वधू वराला नवीन कपडे खरेदी करण्याची परंपरा आहे. लग्नातील सर्वात मोठ्या खर्चापैकी एक खर्च म्हणजे वधू वराचे कपडे. आपण लग्नात अधिक आकर्षित आणि उठून दिसावे यासाठी वधू वर महागड्या ब्रॅण्ड्सचे कपडे वापरतात. बहुतांश वेळा असे दिसून आले आहे की, लग्नाचे कपडे लग्नानंतर पुन्हा वापरात येत नाहीत. अशा परिस्थितीत एका दिवसाच्या कार्यक्रमांसाठी हजारो रुपये खर्च करणे, खरंच योग्य आहे का? याचा विचार करणे गरजेचे आहे. यावर उपाय म्ह्णून कपड्याचे बजेट ठरवणे कधीही उत्तम.

खर्चाला कमी लेखणे

अनेकजण लग्नाच्या खर्चाला कमी लेखतात. मार्केटमधील ट्रेंडनुसार वधू वर लग्नाची थीम ठरवतात व त्यानुसार लग्न करतात. बऱ्याच वेळा या हौसेमध्ये आर्थिक नियोजन केले जात नाही. त्यामुळे प्रचंड खर्च होतो. सध्या महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. अनेक बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे लग्नाचा खर्च भागवण्यासाठी कर्ज घेतल्यानंतर त्यावर व्याजही भरावे लागणार आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 

(Source: fullertonindia.com )