IRCTC Tour Package: IRCTC कडून नवनवीन टुर पॅकेज ऑफर केले जातात. आता IRCTC कडून तिरुपती बालाजीसाठी टुर पॅकेज आले आहे. तिरुपती बालाजी हे एक धार्मिक स्थळ आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही तिरुपती बालाजी मंदिराला अतिशय कमी बजेटमध्ये भेट देऊ शकता. पॅकेज अंतर्गत, प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि सोलापूर स्थानकांवरून डिबोर्ड करू शकतील. या टूर पॅकेजबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
तिरुपती बालाजी दर्शन EX Mumbai असे या ट्रेन पॅकेजचे नाव आहे. हे पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसाचे असेल. या पॅकेजसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती किमान 7,290 रुपये खर्च करावे लागतील. हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. पर्यटकांना खाण्यापिण्याची चिंता करावी लागणार नाही. IRCTC कडून प्रवाशांसाठी नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल.
आयआरसीटीसी टुर पॅकेज डिटेल्स
पॅकेजचे नाव | तिरुपती बालाजी दर्शन EX मुंबई (WMR171) |
फ्रीक्वेंसी | दररोज (4 एप्रिल ते 31 मे, 2023) |
टूर कालावधी | 4 दिवस/3 रात्री |
फॅसिलिटी | नाश्ता आणि रात्रीचे जेवण |
प्रवास मोड | ट्रेन |
क्लास | नॉन-एसी स्लीपर आणि कम्फर्ट (थर्ड-एसी स्लीपर) |
बोर्डिंग/डिबोर्डिंग | लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि सोलापूर |
किती रुपये खर्च करावे लागेल?
प्रवाशांनी निवडलेल्या क्लासनुसार टूर पॅकेजसाठी दर बदलतील. स्टँडर्ड नॉन-एसी स्लीपर क्लासमध्ये प्रवास केल्यास, 9,050 रुपये सिंगल शेअरिंग फी दयावी लागेल. डबल शेअरिंगमध्ये त्याची किंमत 7,390 रुपये आहे. ट्रिपल शेअरिंगमध्ये 7,290 तुमच्यासोबत 5 ते 11 वर्षे वयोगटातील मूल असल्यास, बेडसह 6,500 रुपये आणि बेडशिवाय 6,250 रुपये आकारले जातील.
कम्फर्ट थर्ड-एसी स्लीपर क्लासमध्ये प्रवास केल्यास सिंगल शेअरिंगसाठी 12,100 रुपये मोजावे लागतील. डबल शेअरिंगमध्ये त्याची किंमत 10,400 रुपये आहे. ट्रिपल शेअरिंगमध्ये 10,300 तुमच्यासोबत 5 ते 11 वर्षे वयोगटातील मूल असल्यास, बेडसह 9,500 रुपये आणि बेडशिवाय 9,250 रुपये आकारले जातील.