ITR Helpline: इन्कम टॅक्स विभागाकडून सातत्याने करदात्यांना लवकरात लवकर ITR भरण्याचे आवाहन केले जात आहे. जेणेकरून शेवटच्या क्षणाला होणारी धावपळ टाळता येईल आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीने आयटीआर भरला जाणार नाही. ITR भरण्याची डेडलाईन 31 जुलै, 2023 आहे.
टॅक्सपेअर्सना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना काही अडचणी येत असतील तर इन्कम टॅक्स विभागाकडून हेल्पलाईन, लाईव्ह चॅट, सोशल मिडिया अशा विविध प्रकारे त्यांच्या शंकांचं निरसन केले जात आहे. याबाबत विभागाने एक ट्विट देखील केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ITR भरताना किंवा टॅक्स पेमेंट करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्या हेल्पडेस्कशी संपर्क साधा. आमचा हेल्पडेस्क 24 तास उपलब्ध आहे. तुम्ही फोन कॉल, लाईव्ह चॅट, सोशल मिडियाद्वारे मदत पुरवली जात आहे. ही मदत करदात्यांना शनिवार, रविवारसह 31 जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे.
इन्कम टॅक्स विभागाच्या या हेल्पलाईनच्या मदतीने आयटीआर, इतर व्हॅल्यू अॅडेड टॅक्स सर्व्हिसेस आणि इंटिमेशन, रिफंड आयटीआरशी संबंधित इतर प्रश्न किंवा रेक्टीफिकेशन याबाबत तुम्ही विचारू शकता.
तुम्ही तुमचा पॅन आणि मोबाईल नंबर शेअर करून ई-मेलद्वारे तुमची अडचणी विचारू शकता. विभागाचा ई-मेल आयडी [email protected] आहे. तर फोनद्वारे संपर्क साधण्यासाठी खालील नंबर देण्यात आले आहेत. या क्रमांकावर तुम्ही सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत संपर्क साधू शकता.
1800 103 0025, 1800 419 0025, +91-80-46122000, +91-80-61464700
अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS), तसेच TIS, SFT याविषयी तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही 1800 103 4215 या टोल-फ्री नंबरवर संपर्क साधून दूर करू शकता.
ITR Form-1 पासून ते Form-7 पर्यंत तुमच्या काही अडचणी असतील तर त्या [email protected] यावर मेल पाठवू शकता. e-pay टॅक्स सर्व्हिस संदर्भातील अडचणींसाठी [email protected] आणि इतर वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांसाठी [email protected] यावर संपर्क साधा.