Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Yojana: 2 हजार खात्यात नाही आले, करा मग येथे तक्रार

PM Kisan Installment

PM Kisan Installment: भारतातील शेतकऱ्यांना पिकासाठी आर्थिक मदत व्हावी, या हेतूने शासनाने खास शेतकऱ्यांसाठी 'पीएम किसान समृध्द योजना' सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत होते. ही रक्कम दरमहा 2 हजारच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. जर ही रक्कम या महिन्यात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसेल, तर ते येथे तक्रार करू शकता.

PM Kisan Yojana: पीएम किसान समृध्दी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रू. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. ही रक्कम एकाच वेळी दिली जात नाही.  तर केंद्र सरकार हा निधी तीन वेळा म्हणजे 2000-2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतात. दर महिना या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होती. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही, ते या ठिकाणी तक्रार करू शकतात.

हप्ता जमा झाला नाही (Installment not Deposited)

पात्र असून ही शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता आला नाही, या घटना यापूर्वीदेखील अनेक वेळा घडल्या आहेत. जर तुमच्याबद्दल देखील असे घडले असले, तर नो टेंशन. यावरसुद्धा शासनाने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तत्पूर्वी ही काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करताना त्यांचे बँक खाते किंवा आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने ही माहिती भरली असली, तर त्यांना मिळणारा हा दोन हजाराचा हप्ता बंद होईल. 

कुठे संपर्क करावा (Where to Contact)

तुम्ही जर किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला हप्ता मिळाला नसेल, तर तुम्ही PM Kisan च्या अधिकृत ईमेल आयडीवर pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधू शकता. किंवा 155261 किंवा 1800115566 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकांवरदेखील संपर्क करू शकता. 

अधिकृत वेबसाइट (Official Website)

Farmers Corners वर क्लिक करावे
लाभार्थी स्थितीवर क्लिक करावे
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा शेतकरी खाते क्रमांक टाइप करा
तपशील भरल्यानंतर Get Data वर क्लिक करा
आता तुमचे स्टेटस तुमच्या समोर दिसेल. 
अशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा दोन हजाराचा हप्ता नाही मिळाला, तर तक्रार करू शकता.