Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Investment: रिटायरमेंटमनंतर महिन्याला 20 हजारांचे उत्पन्न हवे; किती रुपयांची SIP करावी लागेल?

SIP Investment for Retirement

SIP Investment for Retirement: नोकरी करणाऱ्या एका तिशीतील तरुणाला वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये निवृत्तवेतन म्हणून हवे असतील तर त्याला प्रत्येक महिन्याला किती रुपयांची एसआयपी करावी लागेल? चला तर जाणून घेऊया.

SIP Investment: नोकरी करणाऱ्या एका तिशीतील तरुणाला वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये निवृत्तवेतन म्हणून हवे असतील तर त्याला प्रत्येक महिन्याला किती रुपयांची एसआयपी करावी लागेल? चला तर जाणून घेऊया.

निवृत्तीच्या वयाचा टप्पा 60 वर्षे आहे आणि त्यातील निम्मी वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजे त्या तरुणाकडे गुंतवणूक करण्यासाठी अजून 30 वर्षे शिल्लक आहेत. पण या 30 वर्षात महागाईचा दर किती आणि कसा वाढेल. हे आपण सांगू शकत नाही. पण तो आताच्या दरापेक्षा नक्कीच जास्त असेल. त्यामुळे 60 वर्षांच्या निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या 20 हजारात कोणत्या गोष्टींची खर्च भागू शकतो. याचा विचार करणे गरजेचे आहे. सध्याचा महागाई दर पाहता 30 वर्षानंतर किमान 60 ते 70 हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे.

गुंतवणुकीसह महागाईचाही विचार होणे आवश्यक

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी जमापुंजी करत असताना आताच्या गुंतवणुकीत महागाईचादर जोडूनच गुंतवणुकीचा विचार करायला हवा. नाहीतर इतक्या वर्षांची गुंतवणूक महागाई कशी खाऊन टाकेल कळणारच नाही. यासाठी गुंतवणुकीच्या रकमेत दरवर्षी महागाई दर म्हणून 5 टक्क्यांची वाढ केली पाहिजे. तसेच ही गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक असली पाहिजे. तरच त्यातून चांगला परतावा मिळू शकतो.

एसआयपीचा गुंतवणूक फॉर्म्युला वापर

सतत 30 वर्षे एका उद्देशासाठी गुंतवणूक करणे, थोडे अवघड वाटू शकते. कारण यामुळे इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बचतीसाठी खर्चात कपात करावी लागू शकते. मौजेच्या खर्चावर बंधने येऊ शकतात. यासाठी निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा पर्याय योग्य ठरू शकतो. यासाठी प्रत्येक महिन्याला किमान 5 हजार रुपयांची एसआयपी केली. तर 30 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 18 लाख रुपये होईल आणि त्यावर म्युच्युअल फंडमधील रेटनुसार 12 टक्के व्याजदर पकडला तर तुमच्या 18 लाखाच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी 76 लाख रुपये होईल.

SIP CALCULATOR

मासिक गुंतवणूक
अपेक्षित परतावा दर
%
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
अंदाजे परतावा
एकूण मूल्य

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखीमयुक्त गुंतवणूक मानली जाते. तसेच या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा मार्केटमधील चढ-उतारावर अवलंबून असल्यामुळे त्याचाही वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे आहे. यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अधिकृत गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे गरजेचे आहे.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)