आर्थिक नियोजन करून योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली, तर तुमच्याकडे भविष्यात मोठा फंड तयार होऊ शकतो. या फंडाचा वापर तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी करू शकता. सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये बँकेतील मुदत ठेव योजना (Bank FD), पोस्टातील वेगवेगळ्या गुंतवणूक योजना (Post Office Scheme), शेअर्स (Share Market), म्युच्युअल फंडातील एसआयपी पद्धत (SIP) आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे बॉण्ड (Company Bonds) इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
भविष्यासाठी आर्थिक नियोजन करताना गुंतवणुकीचे काही फॉम्युले लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘13:13:13’. या आर्थिक फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही भविष्यात मोठा फंड तयार करू शकता. हा फॉर्म्युला नक्की काय आहे, जाणून घेऊयात.
13:13:13 फॉर्म्युल्याबद्दल जाणून घ्या
आर्थिक नियोजन करताना वापरला जाणारा 13:13:13 हा फॉर्म्युला तुम्हाला भविष्यासाठी मोठा फंड तयार करण्यास मदत करेल. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सर्वाधिक परतावा हवा असेल, तर म्युच्युअल फंडातील एसआयपी हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. एसआयपीमध्ये मासिक आधारावर गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी मोठा परतावा मिळवता येऊ शकतो.
जर म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये मासिक आधारावर 13000 रुपयांची गुंतवणूक 13 वर्षांसाठी केली, तर त्यावर वार्षिक अंदाजे 13 टक्के सर्वाधिक व्याजदर मिळेल. या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी गुंतवणूकदाराला 53 लाखांची मोठी रक्कम परतावा स्वरूपात मिळू शकते.याच गुंतवणूक पद्धतीला 13:13:13 फॉर्म्युला असे म्हणतात.
या पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवणूक केली, तर मोठा फंड तयार करू शकता. मात्र म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक तज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा. तसेच फंड निवडताना फंडाच्या कामगिरीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
(डिस्क्लेमर: म्युच्युअल फंडात गुंतवलेला पैसा बाजारातील जोखमीच्या अंतर्गत आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. महामनीने ही बातमी केवळ माहितीसाठी दिली आहे.)
Source: amarujala.com