Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share market : दीड रुपयांच्या शेअरनं कमावले 12.67 कोटी! 'या' बँकेनं तर मोडले सर्व रेकॉर्ड

Share market : दीड रुपयांच्या शेअरनं कमावले 12.67 कोटी! 'या' बँकेनं तर मोडले सर्व रेकॉर्ड

Share market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदाराला रेकॉर्डब्रेक कमाई झाली आहे, तीही केवळ दीड रुपयांच्या शेअरमधून. होय. शेअर मार्केटमध्ये असे काही दीर्घ गुंतवणूकदार आहेत, जे मालामाल झालेत. आता बँकेनं ही कामगिरी करून दाखवलीय.

अब्जाधीश वॉरन बफे (Warren Buffett) यांनी म्हटलंच आहे, की स्टॉक होल्ड करणं आणि खूप काळ वाट पाहणं यात फायदाच आहे. आता हाच फायदा एका बँकेला झालाय. या बँकेच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना 20 वर्षांसाठी करोडपती बनवलंय. ही बँक आहे कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra bank). एका दिवसापूर्वी यात 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. साधारणपणे 20 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 1.50 रुपयेदेखील नव्हती. आज हा शेअर 1850 रुपयांवर व्यवहार करतोय. आता याच शेअरनं गुंतवणूकदारांना अक्षरश: करोडपती बनवलंय.

मागच्या आठवड्यात दिला 5 टक्के परतावा

मागच्या आठवडाभराच्या कालावधीत कोटक महिंद्रा बँकेनं आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के परतावा दिला. एका महिन्यात बँकेच्या शेअर्समध्ये यानंतर जवळपास 10.40 टक्क्यांनी वाढ झालीय. कोटक महिंद्रा बँकेचा समभाग 6 महिन्यांत कंसोलिडेशन स्टेजवर म्हणजेच एकत्रिकरणाच्या टप्प्यावर राहिला. त्यामुळे बँकेच्या शेअर्समध्ये फक्त दोन टक्के वाढ दिसून आली होती. इतर काही क्षेत्रांप्रमाणं या वर्षात बँकिंग क्षेत्रातही काही संकटं आली. यात कोटक महिंद्रा बँकेच्या समभागावरदेखील परिणाम झाला. मात्र अगदीच नकारात्मक स्थितीदेखील नाही. एकूणच अशा परिस्थितीत तो 1.26 टक्के वेगानं तो सपाट झाला.

17 एप्रिल 2003ला समभाग होता केवळ 1.46 रुपये

मागच्या वर्षभरात कोटक महिंद्रा बँकेच्या समभागानं आपल्या गुंतवणूकदारांना 2.5 टक्के इतका परतावा दिलाय. बँकेच्या समभागात पाच वर्षांच्या कालावधीत 60.55 टक्के वाढ झालीय. सध्या कंपनीचा शेअर 1850 रुपयांवर व्यवहार करतोय. मात्र 20 वर्षांपूर्वी 17 एप्रिल 2003 या दिवशी बँकेचा हिस्सा केवळ 1.46 रुपयांवर होता. तेव्हापासून बँकेच्या शेअरनं गुंतवणूकदारांना 1,26,677 टक्के परतावा दिलाय. अशाप्रकारची कामगिरी खूपच दुर्मीळ स्वरुपाची आहे. या 20 वर्षाचा विचार केल्यास गुंतवणूकदारांना 1.25 लाख टक्क्यांहून जास्त परतावा देणारे समभाग फारत कमी आहेत.

कसा झाला कोट्यधीश?

समजा 20 वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदारानं म्हणजे 17 एप्रिल 2003ला 1.46 रुपये प्रति शेअर या दराने 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला एकूण 68,493 शेअर्स मिळाले असते. बँकेच्या शेअरची सध्याची किंमत 1850.95 आहे. तसंच ती दिवसाच्या उच्चांकावर पोहोचलीय. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या शेअर्सचे मूल्य रु. 12,67,77,397.26 आहे. 12.67 कोटी इतकी विक्रमी किंमत आहे ही. हा आकडा 1850.95 प्रति शेअरवर गेलाय. याचा अर्थ कोटक महिंद्रा बँकेच्या समभागांनी 20 वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवलंय.

एक दिवसआधी कामगिरी सपाट

मुंबई शेअर बाजारात एक दिवसआधी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सची कामगिरी सपाट राहिली. सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह हा समभाग बंद झाल्यानंतर तो सपाट व्यवहार करतोय. सकाळी 11.45दरम्यान बँकेचा समभाग 1847.30 रुपयांवर व्यवहार करत होता. सकाळी बँकेचा समभाग 1840.05वर उघडला आणि व्यवहाराच्या सत्रात 1851वर पोहोचला. बँकेच्या शेअर्समध्येही ट्रेडिंगच्या सत्रात घसरण दिसून आली आणि तो 1830.65 रुपयांवर पोहोचला.

शेयर कंसोलिडेशन काय असतं?

शेयर कंसोलिडेशन म्हणजे शेअर एकत्रीकरण होय. ही एक कॉर्पोरेट क्रिया असते. यामध्ये कंपनी शेअर्स एकत्र करून थकबाकी असलेल्या शेअर्सची संख्या कमी करत असते. याठिकाणी दर्शनी मूल्य वाढतं. स्टॉक एकत्रीकरण होण्याआधी कंपनी शेअरधारकांना ई-मेलच्या माध्यमातून आधीच सांगून ठेवत असते. शेयर कंसोलिडेशनला 'रिव्हर्स स्टॉक स्प्लिट' असंदेखील म्हटलं जातं.