Zomato Gold Membership: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमाटोने (Zomato) पुन्हा एकदा लॉयल्टी प्रोग्रॅम ऑफर, झोमाटो गोल्ड (Zomato Gold) लाँच केली आहे. झोमाटो गोल्ड (Zomato Gold) अंतर्गत, वापरकर्त्यांना जेवण आणि खाद्यपदार्थ वितरणावर सूट दिली जाईल. मात्र, या सेवेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी 149 रुपये मोजावे लागतील.
झोमाटो गोल्डचे फायदे (Benefits of Zomato Gold)
झोमाटोने पुन्हा एकदा झोमाटो गोल्ड प्लॅन आणला आहे. गोल्ड प्लॅन बंद करून झोमाटोने झोमाटो प्रो हा प्रोग्रॅम चालवला होता, मात्र त्याला ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी तो बंद केला होता. आता पुन्हा झोमाटो गोल्ड बजेट फ्रेंडली प्लॅनसह आणले आहे.
मुख्य म्हणजे यंदा त्यांनी बजेट फ्रेंडली 149 चा प्लॅन त्यात सामील केला आहे. तर, झोमाटो प्रोच्या सदस्यांना झोमाटो गोल्डमध्ये महिन्यांपर्यंत सामील केले जाणार आहे. मात्र 999 चा प्लॅन कायम असणार, सध्या यात सवलत देण्यात आलेली आहे.
झोमाटो गोल्ड (Zomato Gold) वापरणाऱ्यांना 10 किमीच्या परिघात अमर्यादित मोफत डिलिव्हरी मिळणार आहे, मात्र कमीत कमी 150 रुपयांच्या ऑर्डर देणाऱ्यांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. झोमाटोच्यामते, झोमाटो गोल्ड ही ओळखीच्या नावाने नवीन सदस्यत्व आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना मोफत वितरण, विनाविलंब वितरणाची हमी, गर्दीच्या वेळी व्हीआयपी प्रवेश आणि इतर अनेक ऑफर्स देखील समाविष्ट आहेत. झोमाटो वापरकर्ते ज्यांच्याकडे एडिशन कार्डसह प्रो किंवा प्रो प्लस सदस्यत्व आहे, त्यांची सदस्यता 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत सक्रिय राहील, त्यानंतर त्यांना तीन महिन्यांची झोमाटो गोल्ड मेंबरशिप दिली जाईल.
झोमाटोचे नवे प्रकल्प (Zomato's new projects)
यापूर्वी, झोमाटोने आपल्या अॅपवर 10 मिनिटांच्या आत वितरित करणारी सेवा बंद केली आहे. ज्याला झोमॅटो इन्स्टंट म्हणून ओळखले जात होते. झोमाटाने गेल्या वर्षी दिल्ली एनसीआर आणि बेंगळुरू येथून 10 मिनिटांची अन्न वितरण सेवा सुरू केली. कंपनीला या सेवेचा विस्तार आणि लोकप्रिय करण्यात अडचणी येत होत्या. 10 मिनिटांच्या डिलिव्हरीसाठीही कंपनीला पुरेशा ऑर्डर मिळू शकल्या नाहीत ज्यामुळे कंपनी आपली निश्चित किंमत वसूल करू शकली नाही. कंपनीने म्हटले आहे की ते 10-मिनिटांची डिलिव्हरी थांबवणार नाही, परंतु त्याचे रिब्रँडिंग केले जाणार आहे.
पुन्हा झोमाटोने ग्रोसरी डिलिव्हरीही सुरू केले आहे. मात्र आता यात ग्राोफर्सचे ब्लिंकइट. झेप्टो, बिग बास्केट, स्विगीचे इन्स्टामार्ट आणि जिओमार्ट असा तगड्या खेळाडूंशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यात जिओने नुकतेचम ऑर्डर ऑन व्हॉट्सअॅप सुरू केले आहे. त्यामुळे झोमाटोला पाव यात स्पर्धेत टिकून आपले अस्तित्त्व सिद्ध करावे लागणार आहे.