भारतात गुंतवणूक करण्यासाठी आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी अनेक अॅप व प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यात Zerodha अॅपला ट्रेडिंग करणाऱ्यांमध्ये विशेष मागणी आहे. पण आज सकाळपासून ट्रेडर्सना ट्रेडिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत बऱ्याच जणांनी कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. ट्विटरवरही #zerodhadown हॅशटॅगद्वारे ट्रेडर्स आपला संताप व्यक्त करत आहेत. तर सोशल मिडियावर झेरोधाबाबतचे मीम्स वायरल होत आहेत. याबाबत Zerodha कडून अद्याप काहीच स्टेटमेंट आलेले नाही.
Zerodha Kite मध्ये अडचणी!
Zerodha मध्ये ट्रेडिंग करताना युझर्सना सकाळपासून अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. यापूर्वीही 11 ऑगस्ट रोजी Zerodha Kite मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. ज्यामुळे युझर्सना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं. काही जणांचे यामुळे आर्थिक नुकसानही झालं. मोबाईल अॅपवरून ट्रेडिंग करणाऱ्या युझर्सना याचा त्रास झाला. त्यानुसार त्यांनी Zerodha कंपनीकडे तक्रारसुद्धा केली.
Zerodha Kite च्या अॅपवर सकाळच्या सत्रात प्राईस डिटेल अपडेट होत नव्हत्या. याबाबत Zerodha ने एक नोटीस देखील जारी केली होती. ज्यामध्ये कंपनीने म्हटलं आहे की, ही अडचण दूर करण्यात आली.
Zerodha App च्या या नेहमीच्या तांत्रिक अडचणींमुळे सोशल मिडियावर विशेषत: ट्विटरवर युझर्सनी नाराजी व्यक्त करत Zerodha ला दूषणं दिली आहेत. तर काही युझर्सनी मीम्स वायरल करत Zerodha App ची खिल्ली उडवली.