Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

YouTube monetization: यूट्यूब कमाईविषयी ‘हा’ आहे सगळ्यात मोठा गैरसमज, पैसे नेमके कसे मिळतात ते घ्या समजून

YouTube monetization

यू ट्यूबवरच्या कमाईच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. YouTube कमाई बघून अनेकांना वाटत आपण पण चॅनेल सुरू कराव. हे करत असताना यातून कमाई नेमकी कशी होते याविषयी मोठा गैरसमज दिसून येतो.

बरेचदा तुम्ही ऐकले असेल की एवढे व्यूज मिळाले की गुगलकडून एवढे एवढे पैसे मिळतात. यातून अनेक जण यू ट्यूब चॅनेल सुरू करतात. आज लाखो-कोट्यवधीच्या संख्येने यू ट्यूब चॅनेल सुरू झाली आहेत. यात बराच पैसा दिसत असल्याने वैयक्तिक पातळीवर देखील अनेक जण चॅनेल सुरू करत असतात. मात्र, हे करत असताना ही संपूर्ण प्रक्रिया नेमकेपणाने समजून घेणे आवश्यक आहे.

कमाईचे मार्ग अनेक पण Google AdSense  लोकप्रिय 

यू ट्यूब चॅनेलला Google AdSense मधून मिळणाऱ्या कमाईविषयी आपण इथे चर्चा करतोय. तशी तर चॅनेलवरुन अनेक मार्गांनी कमाई होते. पण, चॅनेल सुरू करताना सगळ्यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने असते ते म्हणजे  Google AdSense. बाकी ब्रॅंड प्रमोशन सारखे पर्याय तेव्हा उपलब्ध होतात जेव्हा आपले चॅनेल ग्रो करू लागते. अगदी AdSense  मधून पैसे मिळण्याच्या अगोदरही यू ट्यूब चॅनेलद्वारे  कशा प्रकारे पैसे मिळवता येतात,  याविषयी महामनीमध्ये सविस्तर वाचता येईल. 

हे सर्व कसे चालते? 

एखाद्या चॅनेलला किती पैसे मिळणार हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. समजा तुमचे एक चॅनेल आहे. आणि आपण असे समजू की, यूट्यूबवरच्या प्लॅटफॉर्मवर केवळ तुमचेच एक चॅनेल आहे. दुसरे चॅनेल नाही. अशा वेळी एखादा जाहिरातदार आला आणि त्याने Google ads च्या माध्यमातून यूट्यूबवर चालवण्यासाठी  100 रुपयाची जाहिरात केली, अस समजू. आता अस होईल की यू ट्यूबवर तुम्ही एकटेच क्रिएटर असल्याने त्या सर्व  जाहिराती  तुमच्या चॅनेलवर दिसतील. आणि या 100 पैकी 45 रुपये स्वत:कडे ठेऊन 55 रुपये गुगल तुम्हाला देईल. 
आता अस समजा की, तुमच्यासोबत आणखी एक चॅनेल आहे. हे चॅनेल आहे टेक्नॉलॉजी, मोबाइल संबंधीचे  आणि तुमचे चॅनेल आहे मिक्स कंटेंटचे. आता जो  जाहिरातदार आहे त्याची जाहिरात आहे एका नव्याने बाजारात आलेल्या मोबाइलची. अशा स्थितीत ही सर्वाधिक शक्यता आहे की, ही जाहिरात तुमच्याकडे न जाता त्या टेक्नॉलॉजी चॅनेलवाल्याकडे जाईल. तुमच्याकडे नाही. आता या दोघांपैकी तुमचे चॅनेल फायनान्सचे असेल आणि जाहिरात फायनान्ससंबंधी असेल तर या जाहिराती तुमच्या चॅनेलवर दिसतील आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळून जातील. 
आज यू ट्यूबवर लाखों -करोडोच्या संख्येने  चॅनेल्स आहेत आणि  जाहिरातदार देखील आहेत.  हेच गणित मोठ्या प्रमाणात देखील लागू होते. मात्र हे सर्वसाधारण विवेचन आहे. हे इथे लक्षात घ्यायला हव कारण या प्रक्रियेला आणखी काही कंगोरे आहेत. जाहिरातदारासाठी जेव्हा Google ads मधून campaign  सेट केल जात तेव्हा त्याच्यासमोर निवडीचे अनेक पर्याय असतात. यावेळी ad सेट करताना काय काय ऑप्शन्स निवडले जातात हे देखील या प्रक्रियेत महत्वाचे ठरते.

तुमचे चॅनेल निश कोणते हे महत्वाचे ठरते 

या सर्व विवेवचनावरुन एवढे views मिळाल्यावर एवढे पैसे असे नसून views आणि मिळणारे पैसे यांचा नेमका कसा संबंध असतो हे लक्षात आल असेल. यातून ज्या चॅनेलला व्यूज जास्त त्या चॅनेलला Google AdSense मधून होणारी कमाई जास्त हा गैरसमज असल्याचे स्पष्ट होते.  
यात तुमचे निश कोणते हे महत्वाचे ठरते. समजा एखाद्या प्रॉडक्शन हाऊसला त्याच्या आगामी वेब सीरिजची जाहिरात करायची असेल, तर त्याला हेच वाटणार की त्याची जाहिरात  एखाद्या film /web series review करणाऱ्या चॅनेलवर चालावी.  यामुळे तुम्ही कोणत्या निशवर काम करताय ही बाब या सगळ्या प्रक्रियेत महत्वाची ठरते. याबाबतीत असे सांगितले जाते किवा सामान्य अंदाज हा वर्तवला जातो की सध्या टेक्नॉलजी रिलेटेड विशेषत: मोबाइलसंबंधी निशवर काम करणारी चॅनेल Google AdSense  मधून तुलनेने जास्त कमाई करताना दिसतात.  

यूट्यूब चॅनेल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय? 

पण हे उत्पन्नही तेव्हा मिळायला लागत जेव्हा तुम्ही Google AdSense साठी पात्र ठरता. आणि यासाठी  4 हजार तास आणि 1 हजार subscriber असा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो. शॉर्ट्स साठी काही वेगळे निकष नव्याने निश्चित झाले आहेत. हा क्रायटेरिया पूर्ण करून Google AdSense अप्रूव्ह झाले तर तुमच्या चॅनेलवरुन  दिसणाऱ्या जाहिरातीतील 55 पैसे तुमचे. नाहीतर 100 टक्के पैसे यू ट्यूबचे.