Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iShield: एकाच स्कीममध्ये हेल्थसह लाइफ इन्शूरन्सही मिळणार, काय आहे कॉम्बो प्रॉडक्टची खासियत?

iShield: एकाच स्कीममध्ये हेल्थसह लाइफ इन्शूरन्सही मिळणार, काय आहे कॉम्बो प्रॉडक्टची खासियत?

iShield: आरोग्य विमा आणि जीवन विमा या दोन्ही गरजा आजच्या काळात विशेष आहेत. यासाठी ग्राहक वेगवेगळ्या विमा योजनांवर पैसे खर्च करतात. मात्र आता ग्राहकांना एकाच उत्पादनात आरोग्य विम्यासह जीवन विम्याचा लाभही मिळणार आहे. काय आहे विशेष? पाहू...

आयसीआयसीआय लोम्बार्ड (ICICI Lombard) जनरल इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स (ICICI prudential Life Insurance) यांनी एकत्रितपणे आयशील्ड (iShield) ही नवीन विमा योजना सुरू केली आहे. ही योजना ग्राहकांच्या आरोग्य आणि जीवन विम्याच्या दोन्ही गरजा पूर्ण करणार आहे. आयशील्ड ग्राहकांना वैद्यकीय उपचारांसाठी गरजेचा खर्च भागवण्यास मदत करणार आहे. तसंच पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला एकरकमी रक्कमदेखील या द्वारे दिली जाणार आहे.

आयशील्डमध्ये काय खास?

या योजनेअंतर्गत आरोग्य विम्याचा भाग हॉस्पिटलायझेशन, डे-केअर ट्रीटमेंट, हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि नंतर तसंच होम केअर ट्रिटमेंटशी संबंधित खर्च समाविष्ट आहे. दुसरीकडे लाइफ इन्शुरन्स कवच 85 वर्षे वयापर्यंत चालू राहील. जरी पॉलिसीधारकाच्या कुटुंबाकडे खर्च भागवण्यासाठी पुरेशी साधनं असली तरी हे संरक्षण दिलं जाणार आहे. रोगाचा धोका आणि जीवितहानी हा ग्राहकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सर्वात मोठा धोका आहे. या विमा सोल्यूशनच्या माध्यमातून आरोग्य आणि जीवन विम्याचे दुहेरी लाभ दिले जाणार आहेत. यामुळे हे एक आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं एक सक्षम उत्पादन बनलं आहे.

टू इन वन

आयशील्ड त्याच्या टू-इन-वन फायद्यांसह येते. आरोग्य विमा आणि जीवन विम्यासाठी स्वतंत्र योजना खरेदी करण्याची ग्राहकांना गरज उरत नाही. त्याऐवजी ग्राहकांना त्यांच्या दोन्ही गरजा एकाच उत्पादनामध्ये मिळतात. ग्राहक एकच अर्ज भरून आणि वैद्यकीय तपासणी करून हा विमा सहज खरेदी करू शकतात. उत्तम एजंट नेटवर्क आणि कंपनीच्या वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपसारख्या अनेक सोयीस्कर टचपॉइंट्सवरून प्रीमियम भरण्याची सोय या जमेच्या बाजू आहेत.

आर्थिक संरक्षण

आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, की आयशील्ड ही एक अशी ऑफर आहे, ज्यात 2 प्रकारच्या विमा पर्यायांमुळे त्याचा प्रभाव आणखी वाढतो. हे उत्पादन आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड अशा दोन्हीचेही फायदे देतं. ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या चांगलं राहण्यासाठी संरक्षण देणारं कव्हर प्रदान करण्याचं आमचं ध्येय आहे.

'आर्थिक समस्या येणार नाहीत'

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य वितरण अधिकारी अमित पल्टा म्हणाले, की आयशील्ड हे एक नवं उत्पादन आहे जे ग्राहकांच्या दोन सर्वात महत्त्वाच्या विमा गरजा पूर्ण करतं. ते म्हणजे आरोग्य आणि जीवन विमा. वैद्यकीय उपचारांवर मोठा खर्च किंवा कमावत्या सदस्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबाच्या आर्थिक गरजा थांबणार नाहीत, याची खात्री आयशील्ड ग्राहकांना देईल.