हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा) विमा घेणे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठं जिकरीचे काम आहे. विमा घेताना मेडिकल हिस्ट्रीचा तपशील घेऊन त्यानुसार वेटिंग पिरिएड ठरवला जातो. ज्येष्ठ नागरिकाला पॉलिसी घेण्यापूर्वी कोणता आजार असल्यास त्याची माहिती विमा कंपनीला द्यावी लागते. त्यानुसार संबधित आजारासाठी विमा क्लेम देण्याबाबत वेटिंग पिरीएड ठरवला जातो. इन्शुरन्सच्या बाबतीत बोलयाचे झाल्यास त्याला प्री एक्झिस्टिंग डिसीजसाठी ठरवला जाणारा वेटिंग पिरिएड. मात्र अनेकदा ज्येष्ठांच्या बाबत क्लेम आल्यास विमा कंपन्यांकडून तो काही ना काही कारणे सांगून नाकारला जातो.
विमा कंपन्यांच्या रिजेक्शनपासून वाचण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेतलेल्या ज्येष्ठांनी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. आपले सदृढ आरोग्य जपले आणि विमा काढताना पुरेशी खबरदारी घेतली तर अनेक फायदे मिळू शकतात. (Tips for senior citizens to avoid health-insurance claim rejection)
सिनियर सिटीझन्ससाठी नियमित उत्पन्न नसणे हा एक मोठा अडचणीचा मुद्दा असतो. त्यामुळे विमा कंपन्या अशा गटातील ग्राहकांना विमा देताना विचार करतात. आयुष्याच्या निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न नसल्यास ज्येष्ठांच्या जीवनशैलीवर परिणाम होतो.
ज्येष्ठांसाठी विमा कंपन्यांना मोठी रिस्क घ्यावी लागते. जितके वय जास्त तितकी आरोग्याबाबत तक्रारी जास्त. त्यामुळे ज्येष्ठांचा विमा प्रीमियम सर्वसाधारण व्यक्तीच्या तुलनेत पाच पटीने अधिक असतो. तसेच या विमा पॉलिसीमधील अटी आणि शर्थी देखील कठोर असतात. वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना नव्याने विमा पॉलिसी इश्यू केली जात नाही. काही निवडक कंपन्या अटी, शर्थी आणि वेटिंग पिरिएड किंवा अतिरिक्त प्रीमियम, को-पेची अट घालून विमा पॉलिसी इश्यू करतात.
विमा कंपन्यांकडून ज्येष्ठांच्या हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम आल्यास कठोर तपासणी केली जाते. अंडर रायटर्सकडून विमा क्लेम रिजेक्ट करण्याबाबत सखोल चौकशी केली जाते. यात काही त्रुटी आढळ्यास विमा रिजेक्ट केला जातो. त्यामुळे पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्थींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून सिनियर सिटीझन्सनी काही पथ्य पाळली पाहिजे.
Table of contents [Show]
तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती सादर करा
हेल्थ इन्शुरन्स नव्याने घेत असताना सिनियर सिटीजन्सनी आरोग्याची संपूर्ण माहिती सादर करायला हवी. तुमची मेडिकल हिस्ट्री जसे की यापूर्वीचे आजार, शस्त्रक्रिया, मेडिकल रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. अनेकदा सिनियर सिटीजन्स हेल्थ इन्शुरन्स काढताना मेडिकल हिस्ट्रीमधील माहिती दडवतात. मात्र त्यावेळी पॉलिसी इश्यू होते. प्रत्यक्षात जेव्हा क्लेम करावा लागतो तेव्हा विमा कंपन्यांकडून सखोल तपास केला जातो. यात जर विमा कंपन्यांना तुम्ही माहिती लपवली असल्याचे निदर्शनात आले तर तुमचा विमा दावा फेटाळला जातो. त्यामुळे सिनियर सिटीजन्सनी हेल्थ इन्शुरन्स काढताना त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे.
हेल्थ इन्शुरन्समधील अटी आणि शर्थी समजून घ्या
हेल्थ इन्शुरन्स ही झटपट काढण्याची बाब नाही. सिनियर सिटीजन्स हे अति जोखीम श्रेणीतील ग्राहक असल्याने विमा कंपन्यांकडून विमा पॉलिसीमध्ये व्यापक अटी आणि शर्थींचा समावेश केला जातो. विमा पॉलिसीमध्ये याचा समावेश केलेला जातो. मात्र सर्वसाधारणपणे 90% ग्राहक विमा एजंटवर भरवसा ठेवून पॉलिसी डॉक्युमेंट साईन करतात आणि पॉलिसी घेतात. मात्र असे करणे धोकादायक ठरू शकते. कारण जेव्हा क्लेमची वेळ येते तेव्हा कंपनी अशाच छुप्या अटी आणि शर्थी दाखवून क्लेम रिजेक्ट करते. त्यासाठी अटी आणि शर्थींचा अभ्यास करुनच विमा घेणे केव्हाही फायदेशीर आहे. विमा सल्लागाराचा सल्ला घेतल्यास पॉलिसीमधील अटी आणि शर्थी समजून घेता येतात.
पॉलिसीचे नुतनीकरण
विमा पॉलिसीचे योग्य वेळेत नुतनीकरण करणे आवश्यक आहे. अनेकदा नुतनीकरण करण्याचा कालावधी उलटून गेला तर पॉलिसी सुरु ठेवण्याबाबत विमा कंपन्यांच्या चौकशीला सामोरे जावे लागते. वेटिंग पिरिएडबाबत देखील सिनियर सिटीजन्सनी सतर्क राहणे आवश्यक आहे. पॉलिसी रिनिव्हल प्रोसेसमध्ये सिनियर सिटीजन्ससाठी वैद्यकिय चाचण्यांकरिता खास वेटिंग पिरिएड दिला जातो. या काळात पॉलिसी कव्हर सुरुच असते हे सिनियर सिटीजन्सनी लक्षात घ्यायला हवे.
कंपनीची विक्री पश्चात सेवा आणि सेवेचा दर्जा
हेल्थ इन्शुरन्स इश्यू केल्यानंतर कंपनीकडून कशा प्रकारे विक्री पश्चात सेवा दिली जाते हा सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे. विमा हे सेवा क्षेत्रात मोडत असल्याने ग्राहकांच्या शंकांचे त्वरीत निरसन करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. विमा कंपन्यांकडून पॉलिसी विक्री केल्यानंतर ग्राहकांना वाऱ्यावर सोडले जाते. अशा वेळी ग्राहक सेवा केंद्र आणि त्यांच्या सेवेचा दर्जा आधी तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच हेल्थ इन्शुरन्सबाबत निर्णय घेतल्यास सिनियर सिटीजन्सला मनस्ताप होणार नाही.