Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World’s Expensive Sandwich: जगातील सर्वात महागडया सॅंडविचची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल...

World’s Expensive Sandwich

Image Source : http://wwwconomictimes.indiatimes.com/

Expensive Sandwich: आपल्याकडे हल्ली सॅंडविच हा प्रकार लोकं आवडीने खात असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे या सॅंडविचमध्ये विविध प्रकारदेखील उपलब्ध आहे. याच्या किंमती आपल्याला दीडशे ते तीनशे रूपयांपर्यंत पाहायला मिळत आहे. पण एक असा ही सॅंडविच आहे की, तो संपूर्ण जगात सर्वाधिक किंमतीचा आहे. त्याची किंमत व काय प्रकारचा सॅंडविच आहे हे पाहूयात.

 Expensive Sandwich in World’s: वडापाव, भेळ, पाणीपुरी नंतर आवडीने खाल्ला जाणारा चटपटीत असा पदार्थ म्हणजे सॅंडविच. कुठे बाहेर फिरायला गेलो किंवा आॅफीस सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळी भुक लागल्यावर अधिक लोक सॅंडविचवर ताव मारतात. हल्ली हा पदार्थ मोठया प्रमाणाता खाल्ला जातो. या सॅंडविचला आपण दीडशे ते तीनशे रूपये मोजू, पण ही किंमतदेखील फार डोक्यावरून जाते. पण तुम्हाला माहिती का, असा ही सॅंडविच आहे, जो संपूर्ण जगात सर्वाधिक महागडा आहे. या सॅंडविचविषयी जाणून घेवुया सविस्तर.

काय किंमत आहे सॅंडविचची (What is the Price of a Sandwich)

जगातील हा सर्वाधिक किंमतीचा सॅंडविच हा 17,000 रूपयात मिळतो. विशेष म्हणजे जगातील सर्वात महागडा सॅंडविच म्हणून याची गिनीज बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. असा हा अजब-गजब विक्रम या सॅंडविचच्या नावावर आहे. तुम्हाला जर हा महागडा सॅंडविच खायचा असेल, तर दोन दिवसापूर्वीच याची आॅर्डर द्यावी लागते. तुम्ही थेट हा सॅंडविच खायला रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकत नाही. यासाठी प्री आॅर्डर द्यावी लागते.

जगातील महागडा सॅंडविच कुठे मिळतो(Where do you Get the World's Most Expensive Sandwich)

‘न्यूयाॅर्क’ या देशात सेरेंडिपिटी 3 या रेस्टॉरंटमध्ये हा सर्वाधिक किंमतीचा सॅंडविच मिळतो. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, क्विंटएसेंशियल ग्रिल्ड चीज सँडविच (Quintessential Grilled Cheese Sandwich) असे या महागडया सँडविचचे नाव आहे.

हे सँडविच महाग का आहे (Why is this Sandwich Expensive)

हे महागडे सँडविच बनविण्यासाठी जे साहित्य वापरले जाते, ते खूपच महाग आहेत. हे सँडविच बनविण्यासाठी फ्रेंच पुलमन शॅम्पेन ब्रेड, पांढरे ट्रफल बटर, कॅसिओकाव्हलो पोडोलिको चीज, दक्षिण आफ्रिकन लॉबस्टर टोमॅटो बिस्क डिपिंग सॉसचा उपयोग केला जातो. याची खासियत म्हणजे हा सँडविच बॅकरॅट क्रिस्टल प्लेटवर सर्व्ह केले जाते. या सर्व साहित्यांना जास्त पैसा खर्च करावा लागतो, त्यामुळे हा सँडविच जगातील सर्वात महाग म्हणून ओळखला जातो.