Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मुलांची क्लासची फी वाचवून करा त्यांच्याच उज्ज्वल भविष्याची तयारी!

मुलांची क्लासची फी वाचवून करा त्यांच्याच उज्ज्वल भविष्याची तयारी!

बाळ झाल्याबरोबर सर्वात आधी पालकांना चिंता लागते ती म्हणजे त्याच्या शिक्षणाची. त्या चिंतेमुळे काही वेळा मुलांचे बालपण हरवून जाते. शाळा, ट्युशन, क्लास यातच मुलं गुंतून जातात. पण तुम्ही तुमच्या मुलांना विशिष्ठ वयापर्यंत घरीच ट्युशन देऊ शकता. यामुळे पैशांची बचत तर होईलच. पण अभ्यास करताना तुमचे मूल तुमच्यासोबतच राहील.

समाजात आणि वातावरणात  ट्युशन ही एक फॅशन बनली आहे. काही लोक आवश्यकतेसाठी ट्युशन लावतात तर काही लोक ते फॅशन म्हणून करतात. एका विशिष्ठ वयानंतर मुलांना ट्युशन लावावी. पण 0 ते 10 या वयाच्या मुलांसाठी ट्युशन इतकी आवश्यक नाही. या वयात अभ्यासबरोबर मुलांना अनेक गोष्टी मिळणे आवश्यक असतात. आजकाल ट्यूशनमुळे मुलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. मग ते फक्त त्यातच गुंतून राहतात. खरे तर  हे त्यांचे खेळण्याचे आणि मौजमजा करण्याचे वय असते, पण त्यांना या सगळ्यासाठी वेळच मिळत नाही. आज घरी जाऊन खेळू किंवा काहीतरी वेगळे करू असा विचार करून मुले शाळेतून घरी येत असतात. पण काही वेळाने घरी आल्यावर त्यांना ट्यूशनला  पाठवले जाते आणि तिथून आल्यानंतर मुलं इतकी दमून जातात की पुन्हा काही करण्याची इच्छा त्यांना होत नाही. अशा स्थितीत त्याचे खेळण्याचे वय संपते. ट्युशनचे फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत; त्यामुळे तुम्ही 0 ते 10 वयोगटातील मुलांना घरीच ट्युशन देऊ शकता त्यासाठी कशाचा आधार घ्यावा ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. 

ट्युशनचे फायदे (Advantages of Tuition Classes)

  • चांगले मार्क्स मिळतात. 
  • मुलांचा आत्मविश्वास वाढतो. 
  • नवीन शिकायला मिळतं. 
  • तुम्हाला अतिरिक्त ज्ञान मिळते. 

ट्युशनचे तोटे (Disadvantages of Tuition Classes)

  • वेगवेगळ्या प्रकारचा तनाव 
  • वेळेच्या अपव्यय 
  • मुलांचे बालपण हरवते 
  • पैसे कमवण्याचे साधन 

ट्युशनचे फायदे आणि तोटे दोन्ही कडे लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की, मुलांचे बालपण हे सर्वात महत्वाचे आहे, म्हणून  मुलांना वयाच्या 10 वर्षानंतर ट्युशन लावणे योग्य ठरू शकते. ट्युशनची फी सुद्धा खूप वाढली आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून  0 ते 10 वर्षांच्या मुलांचा अभ्यास घरीच करून घ्यावा आणि त्यांना ट्युशनच्या चिंतेतून मुक्त ठेवावे. त्यामुळे तुमचे आणि मुलांचे नाते अधिक घट्ट होईल. तुम्ही मुलांना आणि मूल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेतील. वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.  तुम्ही घरच्या घरी मुलांना ट्युशन देऊ शकता. मुलांचा इंटरेस वाढवण्यासाठी पुढील टिप्स वापरू शकता. 

नवनवीन गॅजेट्स (Use New Apps and Gadgets)

मार्केटमध्ये अनेक गॅजेट्स उपलब्ध आहेत, ज्यातून खेळ सुद्धा खेळता येतात आणि नॉलेज सुद्धा वाढते. उदा. मॅजिक प्रॅक्टिस कॉपी बूक, एज्युकेशनल लर्निंग किड्स,  लॅपटॉप रायटींग टॅब स्लेट. यातून मुलांना नवीन टेक्निकबद्दल सुद्धा माहिती मिळेल आणि त्यांना जे शिकवण्याची गरज तुम्हाला वाटेल ते सुद्धा तुम्ही या माध्यमातून शिकवू शकता. 

 बुद्धीला चालना देणारे खेळ (Brain Games)

मुलांशी खेळतांना त्यांना एखादे ड्रॉईंग काढायला देऊन त्यातले काही पार्ट्स तुम्ही काढून द्या. काही मुलांना काढायला सांगा, म्हणजेच ते विचार करून त्यावर काम  करतील आणि त्यांचा यातून अभ्यास सुद्धा होईल. त्यांचा अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाढला की ते ड्रॉइईंगमध्ये आपले करियर सुद्धा करू शकतील. 

यूट्यूबचा आधार घेऊ शकता (Use YouTube Channel)

प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीतच असेल असे नाही त्यासाठी तुम्ही यूट्यूबचा आधार घेऊ शकता. त्यावरून पाहून तुम्ही मुलांना शिकवू शकता. नवनवीन विषयांबद्दल माहिती माहित करून त्याबद्दल मुलांना सांगू शकता. 

गोष्टी सांगू शकता (Develop Story Telling Skill)

चांगले विचार मुलांच्या मनात रुजवणे खूप आवश्यक असते म्हणून तुम्ही मुलांना गोष्टी सांगून त्यातून काय शिकवण मिळाली हे समजावून सांगू शकता. उदा. वाटल्याने प्रेम वाढते, संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र. वातावरणात घडणाऱ्या गोष्टी सुद्धा मुलांना सांगून त्यावर त्यांचे मत जाणून घेवू शकता. 

काही गोष्टी प्रॅक्टिकल दाखवू शकता (Give Practical Knowledge) 

प्राणी, वनस्पती या सर्व बाबी मुलांना पुस्तकातून शिकवल्यापेक्षा प्रत्यक्ष जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतात. उदा. कोरफड म्हणजे काय? त्याचे फायदे काय? या सर्व बाबी मुलांना तुम्ही प्रत्यक्ष समजावून सांगू शकता.

यासर्व बाबी सोबतच मुलांना आईने सांगितलेली गोष्ट लवकर कळते, त्यामुळे तुम्हीच होऊ शकता तुमच्या मुलांच्या टीचर, त्यामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे मूल तुमच्या जवळ राहील आणि पैशाची बचत होईल. आता झालेली बचत मुलाच्या पुढील शिक्षणासाठी कामी येवू शकते.