शेअर मार्केटमध्ये जेव्हा अनिश्चिततेचे वातावरण असते; अस्थिरता (Volatility) मोठ्या प्रमाणात असते. तेव्हा चांगले पोर्टफोलिओसाठी चांगले शेअर्स शोधणे हे एक अवघड काम होऊन जातं. सध्याच्या घडीला पाहिलं तर बरेच शेअर्स हे त्यांच्या 52 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर गेले आहेत. सेन्सेक्स (Sensex) सुद्धा ऑक्टोबरमधील त्याच्या उच्चांकापासून 15 टक्क्यांनी खाली आला आहे आणि बेअर मार्केटच्या 20 टक्क्यांच्या खाली जाण्याच्या तयारीत दिसत आहे.
वाढत्या महागाईमुळे आणि रुपयाच्या कमकुवतपणामुळे आरबीआय (RBI) सुद्धा जागतिक पातळीवरील बॅंकांप्रमाणे व्याज दर वाढीच्या गर्तेत आहे; परिणामी गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. अशावेळी शॉर्ट-टर्म कालावधीत चांगला नफा मिळवून देणाऱ्या शेअर्सबद्दलची माहिती घेऊन आलो आहोत.
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा
सध्याचा भाव 1012 | खरेदी करा; स्टॉपलॉस 850 रूपये, लक्ष्य 1225 रूपये
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी ही भारतातील सर्वांधिक डायवर्सिफाईड कंपनींपैकी एक आहे. मागील 5 सत्रामध्ये या कंपनीचा शेअर 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. 31 मार्च, 2022 मधील तिमाही सप्ताहात कंपनीचा एकूण 427 टक्के फायदा झाल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत कंपनीची वार्षिक वाढ 28 टक्क्यांनी झाली असून कंपनीचे भांडवली मूल्य 17,124 कोटी रूपये होते.
टाटा मोटर्स
सध्याचा भाव 404 | खरेदी करा; स्टॉपलॉस 370 रूपये, लक्ष्य 510 रूपये
टाटा मोटर्स ही भारतातील एक लिडिंग ऑटोमोबाईल कंपनी आहे. मागिल 5 महिन्यात टाटा मोटर्स कंपनीचा शेअर 25 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे सध्या हा शेअर विकत घेण्याची चांगली संधी आहे.
स्ट्राईड्स फार्मा सायन्स लिमिटेड
सध्याचा भाव 306 | खरेदी करा; स्टॉपलॉस 270 रूपये, लक्ष्य 370 रूपये
स्ट्राईड्स फार्मा कंपनी फार्मास्युटिकल प्रोडक्टची निर्मिती करते. या कंपनीचा सुमारे 100 देशांसोबत कारभार सुरू आहे. कंपनीची व्यवस्थापकीय टीम मजूबत आहे. 2022 मधील चौथ्या तिमाहीत कंपनीचे भांडवल 866 कोटी रूपये राहिलं आहे. यात तिमाही अहवालानुसार 9 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर वार्षिक स्तरावर 4.7 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले.
भारती एअरटेल
सध्याचा भाव 660| खरेदी करा; स्टॉपलॉस 635 रूपये, लक्ष्य 710 रूपये
भारती एअरटेल ही भारतातील सर्वांत दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे. भारतात एअरटेलचे 32.6 कोटी सबस्क्राईबर आहेत; तर अफिक्रा खंडातील 14 देशांमध्ये यांचे 12.8 कोटी सबस्क्राईबर आहेत. 31 मार्च, 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत कंपनीला 4.84 टक्क्यांचा नफा झाला असून कंपनीचे भांडवल 31,518.90 कोटी रूपये झाले होते. या तिमाहीत भारती एअरटेलला 3,001.40 कोटी रूपयांचा फायदा झाला होता.
डिस्क्लेमर : महामनी.कॉम वर व्यक्त करण्यात आलेले विचार हे तज्ज्ञांचे स्वत:चे विचार असतात. त्याचा महामनी बेवसाईट व व्यवस्थापनाशी काहीही संबंध नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.