Post Office's India Post Payments Bank : धावपळीच्या जीवनात अनेक दुर्घटना, अपघात होतात. या अपघातांपासून स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने अपघात विमा पॉलिसी घेणे महत्त्वाचे आहे. या योजनेत अपघाताच्या वेळी तुमच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते, त्याचबरोबर पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबालाही या विम्याचा लाभ दिला जातो. अनेक कंपन्या विविध प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करत आहेत. इंडियन पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी खास विमा पॉलिसी आणली आहे.
Table of contents [Show]
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खातेधारकांना कोणते लाभ मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेद्वारे तुम्हाला फक्त 396 रुपयांमध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. या योजनेचा लाभ फक्त इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खातेदारांनाच मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला ही विमा पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्हाला तुमचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत उघडावे लागेल.
पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर 10 लाख रुपये कव्हरेज
या पॉलिसी अंतर्गत, पॉलिसीधारक अपघातात जखमी झाल्यास, त्याला रुग्णालयात दाखल करण्यापासून उपचारापर्यंतचा खर्च दिला जातो. पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, पॉलिसीधारकाच्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या पालणपोषणासाठी 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाते.
396 रुपयांच्या विमा पॉलिसीचे फायदे
या अपघात विमा पॉलिसीनुसार, तुम्हाला वार्षिक आधारावर 396 रुपयांचा प्रीमियम जमा करावा लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेधारक ज्यांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान आहे ते या विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत, अपघाताच्या वेळी पॉलिसीधारकाचे अंशत: अपंगत्व, पूर्ण अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास 10 लाखांचे विमा संरक्षण दिले जाते. यामध्ये आयपीडी 60 हजारांपर्यंतचा वैद्यकीय खर्च आणि 30 हजारांपर्यंतचा अपघाती वैद्यकीय खर्च दिला जातो.
अंतिम संस्कारासाठी येणारा खर्चसुद्धा दिला जातो
पॉलिसीधारकास रूग्णालयात दाखल करताना 10 दिवसांसाठी प्रतिदिन 1000 रुपये दिले जातात. यासोबतच कुटुंबातील सदस्यांच्या रुग्णालयात ये-जा करण्यासाठी 25 हजार रुपये दिले जातात. यामध्ये, अपघातानंतर पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर, पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचे कव्हरेज दिले जाते. त्याच वेळी, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या अंतिम संस्कारासाठी प्रत्यक्ष खर्चासाठी 5000 रुपये कुटुंबाला दिले जातात.
याशिवाय पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना शैक्षणिक लाभही दिला जातो. या अंतर्गत, पॉलिसीधारकाच्या जास्तीत जास्त दोन मुलांना पॉलिसीच्या 10 टक्के किंवा 1 लाख शिक्षणासाठी मिळेल.