Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC चे अधिकृत एजंट बनून करु शकता मोठी कमाई, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

IRCTC  Authorized Agent

IRCTC Authorized Agent : तुम्ही जर का एखादा नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत असाल, तर तुम्ही IRCTC चे अधिकृत एजंट बनून चांगली कमाई करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइटला भेट देऊन एजंट होण्यासाठी अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची पध्दत जाणून घेऊया.

IRCTC  Agent Application Method : नागरिकांना सेवा पुरविणारा एखादा व्यवसाय सुरु करण्याचा आणि त्या माध्यमातून मोठी कमाई करण्याचा तुमचा हेतू असेल तर, IRCTC तुम्हाला ही संधी देते. तुम्ही रेल्वे तिकीट बुकिंग करणारे एजंट म्हणून व्यवसाय सुरु करु शकता. यासाठी तुम्हाला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइटला भेट देऊन एजंट होण्यासाठी अर्ज करावा लागेल. या व्यवसाय मार्फत तुम्ही घरबसल्या दरमहा हजारो रुपये कमवू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी काय करावे लागेल, हे आज आपण जाणून घेऊया.

काय आहे व्यवसायाचे स्वरुप

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ही रेल्वेची सेवा आहे. यावर रेल्वे तिकीट बुकिंगपासून इतर अनेक सुविधा उपलब्ध आहेत. IRCTC च्या मदतीने आपला व्यवसाय सुरु करुन, तुम्ही दरमहा हजारो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून कमाई करू शकाल. ज्याप्रमाणे लिपिक रेल्वे काउंटरवर तिकीट कापतात, त्याचप्रमाणे तुम्हाला प्रवाशांची तिकीटे ही ऑनलाइन कापावी लागतात. ऑनलाइन तिकीटे बुक करण्यासाठी, तुम्हाला IRCTC वेबसाइटला भेट देऊन एजंट होण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही अधिकृत तिकीट बुकिंग एजंट व्हाल. तुम्ही IRCTC चे अधिकृत तिकीट बुकिंग एजंट बनल्यास तुम्ही तत्काळ, RAC, इत्यादींसह सर्व प्रकारची रेल्वे तिकीटे बुक करू शकता. एजंटना तिकीटांच्या बुकिंगवर IRCTC कडून चांगले कमिशन मिळते.

एका तिकीटवर किती कमीशन ?

जर तुम्ही रेल्वे तिकीट कापणारे एजंट बनले, आणि नॉन-एसी कोचचे तिकीट बुक करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला प्रति तिकीट २० रुपये आणि आयआरसीटीसीकडून एसी वर्गाचे तिकीट आरक्षित करण्यासाठी ४० रुपये कमिशन मिळेल. याशिवाय तिकीटाच्या किंमतीच्या एक टक्का रक्कमही एजंटला दिली जाते.

अर्ज कसा करावा ?

अधिकृत एजंट बनण्यासाठी तुम्हाला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि एजंट होण्यासाठी अर्ज करावा लागेल. सगळ्यात आधी नोंदणी फॉर्म ऑनलाइन भरा. तुमची कागदपत्रे म्हणजे पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड ऑनलाइन जमा करा. तुमचा परवाना मिळवा आणि स्वत:चा व्यवसाय सुरु करा. या संपूर्ण प्रक्रियेस साधारणपणे 4 ते 5 दिवस लागतात.

किती फि भरावी लागते ?

IRCTC चे अधिकृत एजंट होण्यासाठी काही फी देखील भरावी लागते. एका वर्षासाठी एजंट होण्यासाठी IRCTC ला ३९९९ रुपये शुल्क भरावे लागेल. जर तुम्हाला दोन वर्षांसाठी एजंट व्हायचे असेल तर तुम्हाला 6999 रुपये भरावे लागेल. याशिवाय तुम्ही जर का एजंट म्हणून एका महिन्यात १०० तिकीटे बुक केलीत, तर प्रति तिकीट १० रुपये द्यावे लागते. तर महिन्याभरात १०१ ते ३०० तिकीट बुक करण्यासाठी प्रति तिकीट ८ रुपये द्यावे लागते. तसेच एका महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकीटे बुक केली तर, प्रति तिकीट पाच रुपये फी भरावी लागते.