येस बँकेच्या (Yes Bank) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील खासगी क्षेत्रातील येस बँकेने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक मिळवण्यासाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ (FD Interest Rate Hike) केली आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
ग्राहकांना 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी मुदत ठेव (FD) करता येणार आहे. त्याकरिता बँक सामान्य नागरिकांना 3.25 टक्के ते 7.75 टक्के व्याज देणार आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार नवीन व्याजदर हे 3 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
7 दिवस ते 180 दिवसांमधील गुंतवणुकीवर मिळणार इतका व्याजदर
येस बँक ग्राहकांना 7 दिवस ते 14 दिवसांच्या मुदत ठेवीवर (FD) 3.25 % व्याजदर देणार आहेत. तर 15 दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 3.70 % व्याज मिळणार आहे. तसेच 46 दिवस ते 90 दिवसांच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 4.10 % व्याज आणि 91 दिवस ते 180 दिवसांच्या गुंतवणुकीवर 4.75 % व्याजदर देण्यात येत आहे.
'या' मुदत ठेवींवरील व्याजदरात केली वाढ
येस बँकेने ठराविक मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ (FD Interest Rate Hike) केली आहे. ज्यामध्ये 181 दिवस ते 271 दिवस आणि 272 दिवस ते 1 वर्षाच्या दरम्यानच्या गुंतवणुकीवर 0.10 टक्के व्याजदरात वाढ केली आहे.
181 दिवस ते 271 दिवसांसाठी आता 6.1 टक्के व्याज दिले जाईल, तर 272 दिवस ते 1 वर्षाच्या दरम्यान केलेल्या मुदत ठेवींवर बँक 6.35 टक्के व्याज मिळणार आहे. तसेच बँक 1 वर्ष ते 18 महिन्यांच्या दरम्यान केलेल्या गुंतवणुकीवर 7.50 टक्के व्याज देणार आहे.
18 महिने ते 36 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 7.75 टक्के व्याज देणार आहे. तर 36 महिने तर 120 दिवसांच्या कालावधीसाठी 7 टक्के व्याज देणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 0.50 टक्के जास्त व्याजदर
येस बँकेने 3 जुलै 2023 पासून नवे व्याजदर लागू केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा व्याजदर वर नमूद करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना वरील कालावधीतील (7 दिवस ते 10 वर्ष ) मुदत ठेवीवरील गुंतवणुकीसाठी बँक 0. 50 % जास्त व्याजदर देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँक 3.75 टक्के ते 8.25 टक्के व्याज देणार आहे.
Source: hindi.moneycontrol.com