लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे. सोबतच जगातील सर्वात तरुण देश म्हणून देखील भारताकडे बघितले जाते. देशात मोबाईल स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रोनिक वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे हे आता जगाने देखील ओळखले आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत आपला जम बसवण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा कमविण्यासाठी मोठेमोठे ब्रांड वेगवगेळ्या उपायोजना आखात आहेत. याचाच एक भाग म्हणून Xiaomi ने ‘मेड इन इंडिया’ चा नारा दिला आहे.
होय, येत्या काही वर्षात भारतात आपले ऑडियो प्रोडक्ट्स बनविण्याची योजना झावमीने जाहीर केली आहे. Xiaomi ही एक चायनीज कंपनी असून, या कंपनीचा मोठा ग्राहकवर्ग भारतात आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने भारतीय बाजारपेठेत मेक इन इंडिया मोहिमेला पुढे नेत optiemus या भारतीय कंपनीसोबत व्यावसायिक भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागीदारी अंतर्गत, Xiaomi ची सर्व वायरलेस ऑडिओ उत्पादने भारतात तयार केली जातील असे स्पष्ट केले आहे.
Xiaomi to make wireless audio products in India https://t.co/FeS7EX9ifL pic.twitter.com/4FelqPvW8H
— Reuters Asia (@ReutersAsia) May 29, 2023
सॅमसंगशी करणार मुकाबला
Xiaomi ला भारतीय बाजारपेठेत कुणाचे तगडे आव्हान असेल तर ते सॅमसंगचे आहे. अलीकडेच सॅमसंगने रेडमीला मागे टाकत भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले होते. भारतीय ग्राहक सॅमसंगला पसंती देत असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे आता Xiaomi ने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 18.9 टक्क्यांनी कमी झाला होता.ऑप्टिमस ही भारतीय कंपनी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील असून, इथे 2025 पर्यंत Xiaomi चे 50% उत्पादने बनवणे सुरु होईल असे कंपनीने जाहीर केले आहे.
किंमती होणार कमी
भारतातच उत्पादन झाल्यास Xiaomi ची उत्पादने कमी दरात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. सध्या चीनमध्ये बनलेली उत्पादने भारतात आयात केले जातात, त्यामुळे त्यांच्या किंमती अधिक आहेत. भारतात उत्पादन सुरु झाल्यास आयात खर्च, सीमा शुल्क कमी होणार असून, ग्राहकांना कमी दरात Xiaomi ची उत्पादने खरेदी करता येणार आहेत.
Xiaomi इंडिया भारतात स्मार्टफोन आणि टीव्ही विकते. भारतात मोठ्या प्रमाणात Xiaomi चा ग्राहकवर्ग आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजे FY22 मध्ये Xiaomi ने भारतात 9% ने त्यांचा व्यवसाय वाढवला होता. भारतात सुमारे 39,099 कोटींची कंपनीने उलाढाल केली होती. ऑडिओ उत्पादक कंपनी म्हणून, Xiaomi भारतात स्पीकर, इअरबड्स, इयरफोन्स इत्यादी वस्तू विकते.