• 28 Nov, 2022 16:30

Mi Pay आणि Mi Credit Apps बंद, भारतातील वित्त सेवेतून शाओमीची माघार

xiaomi, Mi Pay Service Shut

Image Source : Chan Long Hei/Bloomberg -www.retaildetail.eu

Mi Pay and Mi Credit Services Shut in India : कर चुकवेगिरी प्रकरणी शाओमी इंडिया तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. शाओमीवर यापूर्वीच आयकर विभागाने कारवाई केली होती. शाओमीची जवळपास 676 दशलक्ष डॉलर्स संपत्ती तपास यंत्रणांनी गोठवली होती. दरम्यान, केंद्र सरकारकडून 300 हून अधिक चीनी अॅप्स यापूर्वीच ब्लॉक केले आहेत.

स्मार्टफोन्समधील आघाडीची चीनी कंपनी शाओमी कॉर्पोरेशनने भारतातील वित्त सेवेतून माघार घेतली आहे. शाओमीने गुगल प्लेस्टोअर आणि कंपनीच्या अॅप स्टोअरवरुन  Mi Pay आणि  Mi Credit हे अॅप्स बंद केले आहेत. त्याचबरोबर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या अॅपवरुन देखील  Mi Pay हटवण्यात आले आहे.

UPI वरुन पेमेंट करण्यासाठी  Mi Pay हे अॅप वापरले जात होते. मात्र ही सेवा शाओमीकडून बंद करण्यात आली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता कंपनीकडून अचानक या दोन्ही सेवा बंद झाल्याने शाओमीच्या  Mi Pay आणि  Mi Credit युजर्सना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे शाओमी इंडियाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

शाओमीने स्मार्टफोन व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले असून इतर व्यवसाय बंद केल्याचे कंपनीने म्हटलं आहे. मार्च 2022 मध्ये कंपनीने Mi Financial Services ही कंपनी बंद केली होती. Mi Pay हे अॅप मार्च 2019 मध्ये सुरु करण्यात आले होते. या अॅपचे 2 कोटी नोंदणीकृत युजर्स आहेत. कंपनीने Mi Credit हे अॅप 2021 मध्ये सुरु केले होते. Mi Credit मधून युजरला 70 ते 1400 डॉलरचे कर्ज दिले जात होते.

कर चुकवेगिरी प्रकरणी शाओमी इंडिया तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. शाओमीवर यापूर्वीच आयकर विभागाने कारवाई केली होती. शाओमीची जवळपास 676 दशलक्ष डॉलर्स संपत्ती तपास यंत्रणांनी गोठवली होती. दरम्यान, केंद्र सरकारकडून 300 हून अधिक चीनी अॅप्स यापूर्वीच ब्लॉक केले आहेत. त्यामुळे अनेक चीनी कंपन्यांची कोंडी झाली आहे.