इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री करणारी चायनीज कंपनी शाओमीने (Xiaomi) भारतात यशस्वीरित्या 8 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे. गेल्या 8 वर्षात कंपनीने लोकांना सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि सेवा पुरवली आहे. आता कंपनी नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी वेबसाईटवर 'Xiaomi India Turns 9' हा अॅनिव्हर्सरी सेल 2023 लाईव्ह केला आहे. ज्या अंतर्गत मोठा डिस्काउंट ग्राहकांना दिला जात आहे.
हा सेल आजपासून म्हणजेच 13 जुलै 2023 पासून लाईव्ह झाला आहे. तर 16 जुलै 2023 पर्यंत येथून शॉपिंग करता येणार आहे. या 4 दिवसांमध्ये ग्राहक अॅनिव्हर्सरी सेलमधून कमी किंमतीत उत्पादनांची खरेदी करून मोठा डिस्काउंट मिळवू शकतात. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत भाग घेऊन ग्राहक फुकटात शॉपिंगची मजा लुटू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना काय करावे लागेल, जाणून घेऊयात.
स्पर्धेबद्दल जाणून घ्या
शाओमीने आपल्या ग्राहकांसाठी एक कमाल स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा अगदी साधी आणि सोपी आहे.यामध्ये ग्राहकांना 13 जुलै ते 16 जुलै दरम्यान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करावी लागेल.
खरेदी केलेल्या वस्तूचा फोटो काढून तो फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर #XiaomiTurns9 या हॅशटॅगचा वापर करून पोस्ट करावा लागेल. या पोस्टमध्ये @XiaomiIndia ला टॅग करावे लागेल.
हा सेल संपल्यावर कंपनी 9 लकी विजेत्यांना त्यांनी खरेदी केलेल्या उत्पादनांची 100 टक्के किंमत परत करणार आहे. याचा अर्थ नऊ लकी विजेत्यांना फुकटात शॉपिंग करता येणार आहे.
अॅनिव्हर्सरी सेलमध्ये मिळतोय बंपर डिस्काउंट
तुम्हाला देखील स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, इअरबड्स यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करायची असेल, तर शाओमी कंपनीचा अॅनिव्हर्सरी सेल लाईव्ह झाला आहे. यामध्ये सर्वच उत्पादनांवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे.
या सेलमध्ये Redmi 12C स्मार्टफोन 13,999 रुपयांऐवजी ग्राहकांना केवळ 7,799 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच Redmi Note 12 5G हा स्मार्टफोन 21,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Redmi कंपनीचा 32 इंचाचा Smart Fire TV 24,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र या सेलमध्ये तुम्हाला तो वेगवेगळ्या ऑफर्ससहित केवळ 9,749 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यासारख्या अनेक ऑफर्स शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळतील.