Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Xiaomi Anniversary Sale 2023: स्मार्टफोन, टीव्ही इअरबड्स आणि इतर उत्पादनांवर मिळतोय बंपर डिस्काउंट! जाणून घ्या

Xiaomi Anniversary Sale 2023

Xiaomi Anniversary Sale 2023: तुम्हाला देखील शाओमीची उत्पादने कमी किंमतीत खरेदी करायची असतील, तर 'शाओमी अ‍ॅनिव्हर्सरी सेल 2023' सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक बँक ऑफर्स तसेच वेगवेगळ्या उत्पादनांवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

भारतात गेली 8 वर्ष शाओमी कंपनी यशस्वीरित्या काम करत आहे. आता ती नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी वेबसाईटवर 'शाओमी अ‍ॅनिव्हर्सरी सेल 2023' (Xiaomi Anniversary Sale 2023) आयोजित केला आहे. हा सेल कालपासून म्हणजेच 13 जुलै 2023 पासून लाईव्ह झाला आहे. तर 16 जुलै 2023 पर्यंत येथून शॉपिंग करता येणार आहे.

या 4 दिवसांमध्ये ग्राहक अ‍ॅनिव्हर्सरी सेलमधून कमी किंमतीत उत्पादनांची खरेदी करून मोठा डिस्काउंट मिळवू शकतात. तुम्हालाही स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, इअरबड्स यासारख्या उत्पादनांची खरेदी करायची असेल, तर या सेलमध्ये मिळणाऱ्या बँक ऑफर्स आणि इतर डिस्काउंटबद्दल जाणून घेऊयात.

डिस्काउंटबद्दल जाणून घ्या

शाओमीचा अ‍ॅनिव्हर्सरी सेल कालपासून म्हणजेच 13 जुलैपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक बँक ऑफर्स आणि इतर ऑफर्स मिळणार आहे. ग्राहकांनी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरून शॉपिंग केली, तर 8000 रुपयांपर्यंतचा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे.

तसेच Mobikwik च्या माध्यमातून खरेदी केल्यावर 20 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून या सेलमधून खरेदी केली, तर 3000 रुपयांचा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे.

शाओमीने आपल्या ग्राहकांसाठी एक कमाल स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये ग्राहकांना 13 जुलै ते 16 जुलै दरम्यान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करावी लागेल. खरेदी केलेल्या वस्तूचा फोटो काढून तो फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर #XiaomiTurns9 या हॅशटॅगचा वापर करून पोस्ट करावा लागेल. या पोस्टमध्ये @XiaomiIndia ला टॅग करावे लागेल.हा सेल संपल्यावर कंपनी 9 लकी विजेत्यांना त्यांनी खरेदी केलेल्या उत्पादनांची 100 टक्के किंमत परत करणार आहे.

सेलमधील ऑफर्सबद्दल जाणून घ्या

शाओमी अ‍ॅनिव्हर्सरी सेलच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इअरबड्सच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. या सेलमध्ये Redmi 12C स्मार्टफोन 13,999 रुपयांऐवजी ग्राहकांना केवळ 7,799 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच Redmi Note 12 5G हा स्मार्टफोन 21,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Redmi A2 या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये आहे. मात्र या सेलमधून हा स्मार्टफोन ग्राहक केवळ 5,699 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Redmi कंपनीचा 32 इंचाचा Smart Fire TV 24,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र या सेलमध्ये तुम्हाला तो वेगवेगळ्या ऑफर्ससहित केवळ 9,749 रुपयांना खरेदी करता येणार आहे. शाओमीचा स्मार्ट टीव्ही 5A प्रो हा 32 इंचाच्या टीव्हीची किंमत 25,999 रुपये आहे. मात्र बँक ऑफर्स आणि डिस्काउंट पकडून हा टीव्ही ग्राहकांना 13,749 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

तुम्हाला Redmi Pad खरेदी करायचा असेल, तर त्यावर सर्वाधिक डिस्काउंट देण्यात येत आहे. 34,499 रुपयांचा हा पॅड 13,749 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर Redmi Buds 4 Active केवळ 1,399 रुपयांना खरेदी करता येतील.

Redmi Book 15 Pro लॅपटॉप अर्ध्या किंमतीत खरेदी करता येईल. 60,000 लॅपटॉप 36,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. याशिवाय ट्रीमर, पॉवरबँक, इअरफोन यासारख्या उत्पादनांवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे.

Source: navbharattimes.indiatimes.com