सध्या सोशल मिडियावर अॅमेझॉनवरील गुलाबी रंगाच्या प्लॅस्टिक बादलीने (Pink Plastic Bucket) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या गुलाबी रंगाच्या बादलीने सर्वांनाच तोंडात बोटे घालण्याची वेळ आणली आहे. तुम्हालाही याचं कारण कळलं तर तुम्हालाही ‘जोर का धक्का’ बसल्याशिवाय राहणार नाही.
ऑनलाईन शॉपिंग (Online) करणाऱ्यांसाठी अॅमेझॉन (Amazon) किंवा अॅमेझॉनचा सेल नवीन नाही. पण सध्या अॅमेझॉनवरील गुलाबी रंगाच्या प्लॅस्टिक बादलीची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे. सामान्य प्लॅस्टिकच्या बादलीसारखीच ही बादली असूनही तिची एवढी चर्चा का होत आहे. तुम्हीही हे वाचून हैराण झालात ना!
तर या गुलाबी रंगाच्या प्लॅस्टिक बादलीला सोशल मिडियाने डोक्यावर घेण्याचे कारण म्हणजे, या प्लॅस्टिकच्या बादलची अॅमेझॉनने लावलेली किंमत. काय वाटतं तुम्हाला किती असेल या बादलीची किंमत. अॅमेझॉनने या बादलीची किंमत चक्क 25,999 रूपये लावली आहे. ते ही 28 टक्के डिस्काऊंट देऊन. या बादलीची मूळ किंमत 35,900 रूपये आहे आणि खरेदीदारांना ती ईएमआयने सुद्धा खरेदी करता येणार आहे.
सुरूवातील काही जणांना ही किंमत पाहून ती चुकीने छापली गेली असेल, असे वाटले. पण त्याची किंमत तेवढीच असल्याचे कळल्यावर सर्वांनाच धक्का बसला. या बातमीवर सोशल मिडियातून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटचा नुसता पाऊस पडलाय.
image source - https://bit.ly/3wX3vg8