Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Start Up Day: भारतीय उद्योग जगतातील ‘या’ नामवंत व्यक्तींनी साजरा केला वर्ल्ड ‘स्टार्ट अप डे’

Start Up

World Start Up Day: भारत देश हा एक स्टार्टअप हब (Start-Up Hub) म्हणून ओळखला जातो विविध क्षेत्रांत भारतीय उद्योजक (Indian entrepreneurs) प्रथम क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतात. सरकारने तरुण किंवा इच्छुक उद्योजकांना सरकारने विविध योजनांसह प्रोत्साहन दिले आहे. यामुळे स्टार्टअप्सची उभारणी करून अनेकांनी व्यवसायात यश मिळवले आहे.

नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवण्यासाठी वर्ल्डस्टार्ट अप डे 

भारतीय स्टार्टअप स्टार्टअप दिवस 16 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला तसेच यावर्षी स्टार्टअप इंडिया इनोवेशन वीक आयोजित करण्यात आला आहे. डिपार्टमेंट प्रमोशन इंडस्ट्री अँड इंटरनॅशनल ट्रेड (DPIIT) वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या पुढाकाराने उपक्रम राबवला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतात ‘या’ व्यवसायिकांनी हा दिवस साजरा केला व आपले विचार व्यक्त केले.

1) दिव्या जैन Co-founder Seekho

भारतातील बहुतांश स्टार्टअप हे तरुण नेतृत्वांनी उभारले आहेत. गेल्या काही वर्षांपासून तरुणाईने पुढे येऊन भारताच्या अर्थ व्यवस्थेत वाढ होण्यासाठी हातभार लावला आहे. या अशा उपक्रमांमधून नवीन व्यावसायिकांना प्रेरणा मिळते. असे विधान दिव्या जैन यांनी केले.

2) विकी दोडानी Co-founder Agreezi

“राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करणे हे नवोदित व्यवसायिकांसाठी प्रेरणादायक आहे. भविष्यात काही नवीन कल्पनांसह तरुणाई उद्योगक्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करेल. वाढते तंत्रज्ञान व विकसित यंत्रासामग्री  यामुळे शेती(Agro) क्षेत्राला भविष्यात फायदा होणार आहे. यामुळे भारतीय स्टार्टअप ईकोसिस्टिमच्या वाढीला सक्रीयपणे चालना मिळेल.

3) निशांत बहल Co-founder, CEO Expand My Business

स्टार्टअप ईकोसिस्टिमचे मोठे समर्थक असेलेले निशांत बहल म्हणाले की प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान वाढत आहे.उद्योगात तुमचे करिअर उत्कृष्ठ घडवण्यासाठी तुमचा उद्योग डिजिटल असणे गरजेचे आहे.