World Richest Begger : आर्थिक संकट कोसळले की परिस्थिती माणसाकडून काहीही करवून घेते. पडेल ते काम करण्याबरोबर काही लोक भीक मागण्यास देखील मागे पुढे पाहात नाहीत. आपण ज्यावेळी एखादा भिकारी पाहतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर त्याच्या दारिद्र्याने पिचलेल्या परिस्थितीचे कल्पनाचित्र उभे राहते आणि आपण एक दोन रुपये देऊन पुढे निघून जातो. मात्र, तुम्ही कधी या भिकाऱ्यांच्या उत्पन्नाचा अंदाज लावला आहे का? नसेल तर मुंबईत राहणाऱ्या एका भिकाऱ्याचे उत्पन्न आणि संपत्तीची माहिती जाणून घेतल्यास तुम्हीही अचंबित व्हाल.
कोट्यवधीच्या मालमत्तेचा मालक-
भीक मागणे हा एक व्यवसाय झाला आहे हे तुम्ही एकवेळ मान्य कराल. पंरतु यातून कमवलेली संपत्ती ही कोटींच्या घरात असेल तर तुम्हालाही ऐकून धक्का बसेल. मुंबईतच राहणार्या आणि भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याची संपत्ती कोट्यवधी रुपयांची आहे. त्याचे नाव भरत जैन (Bharat Jain) असे आहे. याचा एकच व्यवसाय आहे, तो म्हणजे मुंबईतील आझाद मैदान, सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागणे. या भीक मागण्याच्या व्यवसायातून भरत जैन यांनी कोट्यवधीची संपत्ती जमा केली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत भिकारी World Richest Begger
भरत जैन यांची संपत्तीची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण 7.5 कोटींची संपत्ती आहे. ते भीक मागून महिन्याला 75 हजार रुपये कमावतात. तसेच त्यांचे मुंबईत 1.2 कोटी रुपयांचा 2BHK फ्लॅट आहे. तसेच ठाण्यात त्याची 2 दुकाने असून ती भाड्याने देण्यात आली आहेत. त्यापासून त्यांना महिन्याला सुमारे 30000 रुपये भाडे मिळते. तसेच ते रोज भीक मागून जवळपास 2 ते 2.5 हजार रुपये कमवतात. या सर्व मालमत्ता आणि कमाईमुळे भरत जैन यांची जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून गणणा केली जाते.
मुंबईतच कुटुंब, मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत-
भरत जैन हे त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील परळमध्ये राहतात. गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. जैन हे विवाहित असून त्यांना पत्नी, दोन मुले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबात त्यांचा भाऊ आणि वडील देखील आहेत. भरत जैन हे आपल्या कुटुंबासह 1BHK घरात राहतात. जैन यांच्या मुलांचे कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण झाले आहे. तर कुटुंबातील इतर सदस्य स्टेशनरीचे दुकान चालवतात. भरत यांना त्यांच्या कुटुंबियांनी वारंवार भीक मागण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरत जैन यांनी कुटुंबियांकडे दुर्लक्ष करत आपला भीक मागण्याचा व्यवसाय सुरूच ठेवला आहे.