भारतीयांचे गेल्या काही दशकांपासून क्रिकेट या खेळावर असलेले प्रेम नाकारता येणार नाही. इंग्लंडने सर्वप्रथम जगाला क्रिकेट या खेळाची ओळख करून दिली. जगभरात काही देशांनी या खेळाचा स्वीकार करून अंतराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली व क्रिकेटचे सामने लाईव्ह बघण्यास जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दिली. विकसित तंत्रज्ञानामुळे आता हे सहज शक्य आहे. मात्र सर्वप्रथम सुमारे 85 वर्षांपूर्वी 24 जून 1938 रोजी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) लॉर्डस् स्टेडियम इंग्लंड येथून या सामन्याचे बीबीसी नेटवर्कद्वारे (BBC Network) लाईव्ह ब्रॉड कास्ट करण्यात आले होते.
1938 साली सामना प्रसारित करण्यास यायचा इतका खर्च
याकाळात लाईव्हसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे संशोधन झाले नव्हते. या प्रक्षेपणासाठी फक्त काही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात यायचा. यावेळी कॅमेऱ्याचे ट्रान्समीटर व रिसिव्हर याची किंमत त्यावेळी हजारोंमध्ये असायची. त्यावेळी लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीस लाखोंमध्ये खर्च यायचा.
प्रेक्षकांच्या मागणीमुळे लाईव्ह ब्रॉडकास्टला सुरुवात
घरात बसून निवांतपणे क्रिकेट पाहण्याचा आनंद 1938 पर्यंत शक्य नव्हता. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना लॉर्डस् येथून लाईव्ह दाखविण्यात आला. क्रिकेट खेळाची लोकप्रियता पाहता प्रत्येकाला तिकीट काढून इतर देशात क्रिकेटचा सामना बघायला जाणे परवडत नसे. काही तांत्रिक चमत्कार व्हावा आणि आपल्याला क्रिकेटचा सामना लाईव्ह मिळावा अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा होती. संशोधकांनी ही मागणी लक्षात घेऊन यंत्रप्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली.
सामना लाईव्ह करण्यासाठी BBC समोर हे होते आव्हान
या काळात टी.व्ही. ही कुटुंबाची दैनंदिन गरज नव्हती. क्रिकेट लाईव्ह बघण्यासाठी मात्र टी.व्ही असणे गरजेचे होते. यावेळी टी.व्ही. खरेदी करण्यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे होते. जेव्हा बीबीसीने कॉमेंट्रीसह सामना लाईव्ह प्रसारित केला. यावेळी बरेच लोक आकर्षित झाले आणि परिणामी क्रिकेटप्रेमी देशांमध्ये टी.व्ही खरेदी करण्यास ग्राहकांनी सुरुवात केली.
प्रत्यक्ष मॅच सुरु असताना कॉमेंट्री करणारी पहिली व्यक्ती
लाईव्ह क्रिकेटसह कॉमेंट्री देखील खूप महत्वाची आहे. 1938मध्ये 24 जून रोजी सकाळी 11:26 वा. सामन्याच्या लाईव्ह ब्रॉडकास्ट करण्यास सुरुवात झाली. या टेलिव्हिजनवर प्रथम प्रसारित झालेल्या सामन्यात टेडी वाकेलम (Teddy Wakelam is First Commentator ) यांनी कॉमेंट्री केली होती.