Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Environment Day: बांबूच्या कलाकृतींचा पर्यावरणपूरक व्यवसाय कसा सुरू करू शकता? वाचा

World Environment Day

Image Source : https://www.freepik.com/

पर्यावरणाशी संबंधित बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी व पर्यावरणाचे जतन करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा केला जातो.

जगभरात पर्यावरणाचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. वाढते प्रदुषण, प्लॅस्टिकच्या वस्तूंचा अतिरेक वापर यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पर्यावरणाशी संबंधित बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी व पर्यावरणाचे जतन करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा केला जातो.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पर्यावरणपूरक व्यवसायाला सध्या प्राधान्य दिले जात आहे. सरकारकडून देखील अशा व्यवसायांना प्रोत्साहन दिले जात आहे. तुम्ही देखील पर्यावरणपूरक व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर बांबूची शेती अथवा बांबूपासून बनणाऱ्या कलाकृतींचा व्यवसाय सुरू करू शकता. 

बांबूच्या कलाकृतींचा व्यवसाय कसा सुरू करू शकता 

तुम्ही बांबूची शेती अथवा बांबूपासून बनणाऱ्या वस्तूंच्या निर्मिती-विक्रीचा व्यवयास सुरू करू शकता. गेल्याकाही वर्षात बांबूची शेती करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, बांबूची शेती करण्यासाठी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन असायला हवी. तुम्ही दर हेक्टरी 700 ते 800 बांबूच्या झाडांची लागवड करू शकता. एकदा लागवड केल्यानंतर पुन्हा पुन्हा लागवड करण्याची गरज पडत नाही. 3-4 वर्षानंतर बांबूची विक्री करता येईल.

याशिवाय, तुम्ही बांबूपासून बनणाऱ्या आकर्षक वस्तूंच्या निर्मिती-विक्रीचाही व्यवसाय सुरू करू शकता. सध्या बाजारात बांबूपासून बनणाऱ्या पर्यावरणपूरक वस्तूंना प्रचंड मागणी आहे. सजावटीच्या वस्तू, पाण्याची बाटली, भांडी, फर्निचर, फ्लॉवर पॉट अशा वस्तूंना मोठी मागणी आहे. मात्र, या व्यवसायासाठी तुम्हाला थोडी जास्त गुंतवणूक करावी लागू शकते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?

बांबूची शेती करण्यासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. याच्या लागवडीसाठीही जास्त खर्च येत नाही. बांबूची रोपे 50 ते 100 रुपयांपर्यंत मिळतात. सर्वाधिक खर्च हा जमिनीसाठी येतो. तुमच्याकडे जर स्वतःच्या लागवड योग्य जमीन असेल तर हा खर्चही वाचेल. बांबूच्या कलाकृतींचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त गुंतवणूक करावी लागू शकते. यासाठी जमिनीचे भाडे, कारागीरांचा पगार, मशीन्स इत्यादीसाठी 3 ते 4 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. मात्र, यातून मिळणारे उत्पन्न हे गुंतवणुकीपेक्षा दुप्पट असेल. 

वस्तूंची ऑफलाइन व ऑनलाइन करा विक्री

गेल्याकाही वर्षात बांबूच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढली आहे. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे बांबू इंडिया. पुण्यातील या कंपनीचे वर्षाचे टर्नओव्हर कोट्यावधी रुपये आहे. कंपनीद्वारे बांबूपासून बनवलेले ब्रश, पाण्याची बाटली, डोर बेल, पेन अशा विविध वस्तूंची विक्री केली जाते.

तुम्ही देखील कमी गुंतवणुकीत अशा वस्तूंच्या निर्मिती-विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. पर्यावरणपूरक व्यवसाय सुरू करायचा असल्यास हा नक्कीच एक चांगला पर्याय आहे.