World bamboo Day 2023: आज 18 सप्टेंबर 2023 जागतिक बांबू दिन आहे. बांबूला ‘ग्रीन गोल्ड’ असंही म्हटलं जाते. बांबूपासून तयार केलेल्या वस्तुंचा वापर वाढावा, त्याबाबत जनजागृतीचे व्हावी यासाठी बांबू दिन साजरा केला जातो. पर्यावरण रक्षणावर फक्त बोलत बसण्यापेक्षा बांबूपासून तयार केलेल्या वस्तू वापरून पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवा.
बांबूपासून शेकडो वस्तू तयार केल्या जातात ज्या तुम्ही दैनंदिन जीवनात वापरू शकता. प्लास्टिक किंवा इतर धातूच्या वस्तुंना बांबू चांगला पर्याय आहे. मात्र, दुर्देवाने बांबूच्या उत्पानदांची इतर वस्तुंप्रमाणे मार्केटिंग झाली नाही. काही वेबसाइटद्वारे ऑनलाइन बांबू पासून तयार केलेल्या दररोजच्या वापरातील आणि कलाकुसरीच्या वस्तूंची विक्री केली जाते.
या जागतिक बांबू दिनी पर्यावरणाला पूरक अशा वस्तू वापरण्याचा संकल्प करूया. तुम्ही अगदी छोट्या मोठ्या वस्तू जसे की मोबाइल स्टँड, चहाचा कप, दात घासण्यासाठीचा ब्रश, दिवाळीचे दिवे, लँप अशा वस्तू माफक दरात खरेदी करू शकता. भारतातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी जमाती बांबूपासून वस्तू तयार करतात. त्यांच्या मालालाही मार्केट मिळेल आणि मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल.
बांबू आर्टक्राफ्ट (bambooartcraft)
बांबू आर्टक्राफ्ट ही मध्यप्रदेशातील कंपनी आहे. या कंपनीच्या ऑनलाइन साइटवर बांबूपासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी मिळतील. (bamboo art online shopping sites) बैलगाडी, घर, घोडागाडी, टेबल खुर्ची, बांबूपासून बनवलेली भिंती चित्रे, तोफ अशा वस्तू मिळतील. अतिशय नाजूक कलाकुसर आणि बारीक बांबूच्या काड्यांपासून तयार केलेल्या वस्तू आकर्षक दिसतात. प्लास्टिक किंवा स्टीलपासून तयार केलेल्या वस्तूंपेक्षा बांबूची युनिक डिझाइन तुमच्या घराची शान वाढवेल. या लिंकवर उत्पादने पाहू शकता.
झबुआ क्राफ्ट्स (jhabuacrafts.com)
गणेशोत्सव, दसरा दिवाळी सण जवळ आले आहेत. सणांसाठी जर तुम्ही दिवे, पणती घेण्याचा विचार करत असाल तर झबुआ क्राफ्ट्स हे संकेतस्थळ नक्कीच पाहा. या साइट्सवर तुम्हाला अत्यंत आकर्षक असे बांबूपासून बनवलेले दिवे, लँप, पाहायला मिळतील. प्लास्टिक, स्टील, मातीच्या दिव्यांपेक्षा हे बांबूचे दिवे आकर्षक दिसतात. सोबतच मोबाइल स्टँड, चहाचे कप अशा इतरही बांबूपासून तयार केलेल्या वस्तू मिळतील. या लिंकवर तुम्हाला उत्पादने पाहायला मिळतील. या लिंकवर उत्पादने पाहू शकता.
द व्हिलेज क्राफ्ट्स स्टोअर (thevillagecraftstore.com)
द व्हिलेज क्राफ्ट्स स्टोअर या संकेतस्थळावर तुम्हाला बांबूपासून तयार केलेले घरातील फर्निचर मिळेल. बांबू बेड, लहान मुलांचा बेड, फुलदाणी, जार, हँगिंग लाइट्स, फुलदानी असे अनेक प्रॉडक्ट पाहायला मिळतील. 100 रुपयांपासून पुढील वस्तूही मिळतील. पाण्याची बाटली, कप, चमचे, ब्रश, प्लेट्स, बास्केट असे बारीक कलाकुसर असलेल्या वस्तू आहेत. किंमतही परवडणारी आहे. या लिंकवर उत्पादने पाहू शकता.
एथिका ऑनलाइन (ethicaonline)
एथिका ऑनलाइन या साइटवर बांबूपासून तयार केलेल्या हजारो वस्तू आहेत. बांबूपासून तयार केलेल्या देवीदेवतांच्या मूर्ती, सोफा, डायनिंग टेबल, कपडे ठेवण्यासाठीचे बास्केट, हँड बॅग, खुर्ची अशा वस्तू आहेत. साइटवर 100 रुपयांपासून पुढे बांबूच्या वस्तू मिळतील. बांबूपासून बनवलेले बेड, सोफा, चेअरमुळे तुमच्या घराला युनिक लूक येईल. या लिंकवर उत्पादने पाहू शकता.
नमस्ते बांबू (namastebamboo)
नमस्ते बांबू ही झारखंड येथील कंपनी आहे. नमस्ते बांबू या संकेतस्थळावरून तुम्हाला बांबूपासून बनवलेला कंगवा, खुर्ची, दिवे, झाडे लावण्यासाठी ट्री प्लान्टर, बॅग, चमचे अशा वस्तू मिळतील. या लिंकवर उत्पादने पाहू शकता.