Construction Worker Safety Kit: गाव खेड्यांमध्ये सरकारकडून अनेक नागरिकांना रोजगार मिळवून दिला जातो. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत कामगारांकरिता विविध प्रकारच्या 24 कल्याणकारी योजना राबविल्या जातात. विविध योजनांपैकी बांधकाम कामगारांना पेट्या म्हणजेच सेफ्टी किट वाटप करणारी महत्त्वाची योजना सध्या राबविण्यात येत आहे. अनेक गावात या योजनेचा लाभ घेण्यात आला आहे. बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही योजना होय. बांधकाम कामगारांना काम करत असताना अनेक प्रकारच्या आपत्तीला तोंड द्यावे लागते.
बांधकाम कामगार पेटीत कोणत्या वस्तू असतात?
बांधकाम कामगारांना सुरक्षा किट पुरविण्यात येते त्यामध्ये विविध वस्तूंचा समावेश असतो.
- सेफ्टी हेल्मेट
- टॉर्च
- काम करताना आवश्यक असणारे शूज
- जॅकेट
- बॅग
- सेफ्टी बेल्ट
- चटई
- मच्छरदाणी
- टिफीन बॉक्स
अशा अनेक प्रकारच्या वस्तु बांधकाम कामगारांना सेफ्टी किट मार्फत वितरित करण्यात येत आहेत.
बांधकाम कामगार सेफ्टी किट कुणाला मिळेल?
सेफ्टी किट ही बांधकाम विभागाच्या नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांनाच वितरित करण्यात येते. ज्या कामगारांनी बांधकाम विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली असते. व त्यांच्याकडे बांधकाम कामगाराची पुस्तक असते अशाच नोंदणीकृत कामगारांना या बांधकाम कामगार पेट्या वितरित करण्यात येत असतात.
तुम्हाला सुद्धा बांधकाम कामगार सुरक्षा पेटी मिळवायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून अर्ज करा, तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सुरक्षा संच मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल.
बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची?
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या (Maharashtra State Building and Other Construction Labor Department) मार्फत अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना या बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विमा तसेच घरकुल कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत तसेच शिक्षणासाठी मदत अशा अनेक योजनांचा समावेश आहे.
आता पर्यंत अनेक गावातील लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यासाठी त्यांनी बांधकाम विभागमध्ये नोंदणी करून csc सेंटरमध्ये फॉर्म भरून घेतला. यासाठी लागणारे डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड, कामाचे दिवस लिहले असलेला दाखला, रहिवाशी दाखला हे सुद्धा फॉर्मसोबत सबमिट केले. फॉर्म भरल्यानंतर 1 महिन्यामध्ये सेफ्टी किट ग्रामपंचायतमध्ये जमा होते. एका व्यक्तीला एकच वेळा सेफ्टी किट दिली जाते.
(Source: https://mahabocw.in)