Mumbai Metro: शिंदे- फडणवीस सरकार यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुंबई मेट्रो प्रकल्पातील अनेक मंजुऱ्या तातडीने दिल्या गेल्या. मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 प्रवाशांच्या सेवेत कार्यान्वरीत झाल्याने मेट्रो लाईन 3 बीकेसी स्थानकाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. हे मेट्रोचे स्थानक अंतिम टप्प्यात मेट्रो 2 B ला जोडले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि मध्य रेल्वेतील उपनगरांना जोडणारे मेट्रो स्थानक म्हणून वांद्रे कुर्ला संकुलला ओळखले जाणार आहे. या कामाची पाहणी नुकतीच मेट्रो रेल्वे महामंडळाच्या संचालिका अश्विनी भिडे(Ashwini Bhide) यांनी केली आहे. चला यावर एक नजर टाकुयात.
सर्वात मोठे रेल्वे स्थानक
वांद्रे कुर्ला मेट्रो रेल्वे स्थानक हे या मार्गिकेवरील अत्यंत महत्त्वाचे स्थानक असणार आहे. विशेष म्हणजे मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग हा बहुतांशी भुयारी आहे. एकच रेल्वे स्थानक वरील बाजूस आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथे भविष्यकाळात बुलेट ट्रेनदेखील जोडली जाणार आहे त्यामुळे येथील स्थानकाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्थानकाची लांबी 474 मीटर लांब आणि 32.5 मीटर रुंद आहे. हे मेट्रो रेल्वेमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक असणार आहे. मेट्रो रेल्वे मार्गीका तीनचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. अनेक प्रकारचे तांत्रिक स्थापत्य कामे हे शेवटच्या टप्प्यात आले असून झपाट्याने प्रगती सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरातून कोणालाही मध्य रेल्वेवर किंवा हार्बर रेल्वेला पटकन जाता येणार आहे.
मार्गिकेवर एकूण 27 स्थानके
कुलाबा ते वांद्रे-सिप्झ हा 33.5 कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग असून या मार्गावर 27 स्थानके आहे. त्यापैकी 26 भुयारी व 1 जमिनीवर असणार आहे. यामध्ये कफ परेड ते विधान भवन चर्चगेट, हुतात्मा चौक ज्या ठिकाणी अनेक कॉर्पोरेट कार्यालय आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते काळबादेवी ते गिरगाव, ग्रँड रोड मुंबई सेंट्रल महालक्ष्मी नेहरू तारांगण, आचार्य अत्रे चौक ते वरळी प्रभादेवी दादर, शितलादेवी धारावी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, सांताक्रुज, डोमेस्टिक विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका ते एमआयडीसी, सीब्स आणि शेवटचे रेल्वे स्थानक आरे डेपो आहे.