Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Women Deposits: महिलांचा बँकिंग व्यवस्थेतील सहभाग वाढला; दरडोई बचत ठेवीचं प्रमाण 42 हजारांवर

Women Empowerment

Image Source : www.livemint.com

मागील पाच वर्षात देशात महिलांचा बँकिंग व्यवस्थेतील सहभाग वाढला आहे. बचत ठेवी, कर्ज घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मेट्रो शहरांमध्ये ही वाढ सर्वाधिक आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्थिती काय आहे ते वाचा.

Women Deposits Increased: महिलांचा बँकिंग क्षेत्रातील सहभाग वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. निमशहरी आणि आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. महिलांच्या बचत ठेवी, कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंटने यासंदर्भात अहवाल तयार केला आहे. यातून महिलांचा बँकिंग व्यवस्थेतील सहभाग किती आहे याची आकडेवारी समोर आली आहे. 

स्टेट बँकेच्या अहवालातील प्रमुख मुद्दे

महिलांच्या दरडोई बचत (Womens Per capita Deposits in Bank) ठेवींचे प्रमाण मागील पाच वर्षात 4,618 रुपयांनी वाढून 42,503 वर पोहचले आहे. 2019 साली हे प्रमाण 37,885 रुपये होते.

शहरी भागात महिलांच्या बचत ठेवींचे प्रमाण 5 वर्षात 9,758 रुपयांनी वाढून 61,738 रुपयांवर पोहचले.

मेट्रो शहरात महिलांच्या दरडोई बचत ठेवी 83,434 रुपये आहेत.

निमशहरी भागात महिलांच्या दरडोई ठेवींचे प्रमाण 29,563 रुपये तर ग्रामीण भागात 18,563 रुपये आहे.

देशभरातील शेड्यूल्ड कमर्शियल बँकांतील (SCB) महिलांच्या ठेवी वाढल्या.

बँकांमधील एकूण बचत ठेवींमध्ये महिलांच्या बचत ठेवींचे प्रमाण 20.5% असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.

कर्ज घेणाऱ्या महिलांचे प्रमाणही वाढले

कृषी, उद्योग, निर्मिती, व्यापार अशा विविध गरजांसाठी महिला ग्राहकांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले.

क्षेत्रीय ग्रामीण बँकामध्ये (RRB) महिलांच्या ठेवींचे प्रमाण 34% आहे. या बँकांमधील 50% खाती महिलांची आहेत.

एकंदर महिलांच्या ठेवींच्या वाढीमध्ये खासगी बँकांचा वाटा सर्वाधिक. 

ज्येष्ठ महिलांच्या (60 वर्षावरील) बचत ठेवी 13.2 लाख कोटी आहेत. एकूण महिलांच्या बचत ठेवींपैकी हे प्रमाण 36% आहे. 

मागील पाच वर्षात गोवा, कर्नाटक, हरियाणा, केरळ, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र या 9 राज्यात महिलांच्या दरडोई ठेवींचे प्रमाण 10 हजारांपेक्षा जास्त वाढले. 

वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) घेणाऱ्या महिलांचे प्रमाण 2019 पासून 20.5 टक्क्यांच्या जवळपास आहे. यात मोठी वाढ झाली नाही.