Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Melghat News: मेळघाट मधील महिलांनी तयार केला 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्क, जाणून घ्या त्याची मार्केटमध्ये किंमत किती?

Toxic Free Farming

Image Source : www.newindianexpress.com

Toxic Free Farming : विषमुक्त शेतीसाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील महिलांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली आहे. पेरणीनंतर रोगमुक्त पिकासाठी दशपर्णी अर्काची फवारणी करणे खूप उपयुक्त ठरते. चिखलदरा तालुक्यातील 21 गावातील महिला बचत गटांनी मेळघाट पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एकूण 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. जाणून घेऊया, त्या अर्कची मार्केटमध्ये किंमत किती असेल?

Toxic Free Farming : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये विषमुक्त शेतीसाठी महिला बचत गटाने उपक्रम राबविला आहे. या बचत गटाने 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. जंगलातील विविध वनस्पतींचा पाला जमा करून दशपर्णी तयार करण्यात येतो. विषमुक्त शेतीसाठी मेळघाटातील महिलांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली आहे. पेरणीनंतर रोगमुक्त पिकासाठी दशपर्णी अर्काची फवारणी करणे खूप उपयुक्त ठरते. चिखलदरा तालुक्यातील 21 गावातील महिला बचत गटांनी मेळघाट पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एकूण 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. जाणून घेऊया, त्या अर्कची मार्केटमध्ये किंमत किती असेल?

अर्क कसा तयार केला जातो? 

कडुनिंब, करंज, निरगुडी, रुई, बेशरम, महारुग, मोगली, एरंड, कन्हेर, धोत्रा, सिताफळ, रायमुनिया या वनस्पतीपासून दशपर्णी अर्क तयार केला जातो. त्याचबरोबर गोमूत्र, शेण, मिरची, लसूण, पाणी इत्यादी साहित्यही त्यात वापरले जाते. हे सर्व सामग्री बारीक करून त्यात इतर घटक टाकून त्याला 30 ते 35 दिवस ढवळावे लागते. त्यानंतर अर्क तयार होतो. 

संपूर्ण अर्काची किंमत किती असणार? 

दशपर्णी अर्क घरच्या घरी तयार करता येऊ शकतो. वातावरणातील वनस्पती स्वतः आणल्यास 1 रुपया खर्च न करता हा अर्क तयार केला जाऊ शकतो. शेती तज्ञाच्या सांगण्यानुसार हा अर्क पिकासाठी खूपच उपयुक्त ठरतो. विषमुक्त पीक घेण्यासाठी हा अर्क अत्यंत महत्वाचा आहे. मार्केटमध्ये या अर्कची किंमत बघितली तर 200 रुपये लिटर आहे. ETV Bharat ने केलेल्या बातमीनुसार, चिखलदरा तालुक्यात महिलांच्या 21 बचत गटांनी एकूण तयार केलेल्या 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्काची किंमत आज 10 लाख 80 हजार एवढी आहे.

दशपर्णी अर्क कशासाठी वापरतात? 

दशपर्णी अर्क हे उत्तम प्रतीचे कीडनाशक आहे. याचा उपयोग सेन्द्रिय शेतीमध्ये केला जातो. यात 10 प्रकारच्या पानांचा अर्क वापरल्या जातो. असा तयार केलेला 125 मिलि अर्क हा 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची पिकांवर फवारणी करतात.