Women's Employment: अमरावती जिल्ह्यातील महिला विकास मंच, वरूड ही एक सामाजिक संस्था असुन वरूड तालुक्यात विविध उपक्रम राबवित असतांना 12 वर्षे पुर्ण झालेली आहेत. महिला विकास मंच, वरूडमधील सर्व महिलांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळावा त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीन विकास साधावा या उदात्त हेतूने हे हक्काचे व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून दिले आहे.
महिला विकास मंच, वरूडच्या अध्यक्षा मायाताई यावलकर म्हणतात, माझ्या भगिनी खऱ्या अर्थाने सक्षम तेव्हाच होईल जेव्हा ती स्वतःची रोजगार प्राप्ती स्वाभिमानाने करायला सुरवात करेल. महिला विकास मंच, वरूड ही एक सामाजिक संस्था असून महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून विविध विषय, समित्या सांस्कृतिक विभाग, कायदेविषयक मार्गदर्शन विभाग N.G.O. उद्योजकता विभाग, आरोग्य विभाग, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, कामगार विभागच्या अंतर्गत गेल्या 12 वर्षापासून वरूड तालुक्यामध्ये सातत्याने कार्यरत आहे.
यामाध्यमातून महिलांनी गृहउपयोगी उत्पादन विक्री केन्द्र (उन्हाळी वाळवट, उदाः पापड, सरगुंडे, शेवया, पापडा, बटोळे वगैरे तसेच सॅनेटरी नॅपकीन (पॅड) याची विक्री करून रोजगार मिळवला आहे. आज 48 सदस्यांना रोजगार प्राप्ती झाली आहे.
गेल्या 3 वर्षापासून सतत चालू असलेले उपक्रम
योग प्राणायाम वर्ग डॉ.सौ. मिनाताई बंदे यांचे राहत्या घरी, रोज सकाळी 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत नियमित चालू आहे. कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र (एन.जी.ओ.) च्या अंतर्गत आजपर्यंत 83 महिलांना सामाजिक व कौटुंबिक स्तरावर न्याय मिळवून दिला व शाळा/महाविद्यालयामध्ये लैंगिक समस्या स्वसंरक्षण व आरोग्य विषयक मार्गदर्शन वर्ग राबवित आहे.
ग्रुहोपयोगी उत्पादन विक्री केंद्राअंतर्गत महिलांना सर्वच वस्तु सवलत दरात उपलब्ध करून दिल्या जातात. (उन्हाळी वळवट, सॅनिटरी नॅपकिन्स, वगैरे) वरूड शहरातील दवाखाने, स्टेशनरी, हॉटेल, ब्युटी पार्लर वगैरे. प्रतिष्ठानांच्या माध्यमातुन सवलत कार्ड दिलेले आहे. महिलांना रोजगार प्राप्तीची उत्तम संधी निर्माण करून दिली असून यापुढेही अनेक उद्योग निर्मीतीचा मानस आहे.
आम्ही आमच्या प्रतिष्ठानांच्या माध्यमातुन सर्व उत्पादने अगदी माफक दरात उपलब्ध करून देत असतांना, वरूड शहरातील इतर प्रतिष्ठानांनी दवाखाने, औषधालये, जडीबुटी, मेवा, स्टेशनरी, ज्वेलरी, ब्युटीशियन, फॅशन डिझायनर, गारमेंटस, होटल, दुध डेअरी, ड्रायव्हींग क्लासेस, प्रिंटींग प्रेस इत्यादि ठिकाणी आमच्या सदस्यांनी पारिवारीक सदस्यांना सवलत दराने उपलब्ध करून दिली. त्यामुळे आता तुम्ही वर्षभर वस्तु खरेदीवर बचतीची उत्तम सवय लावू शकता आणि आर्थिक बचत करू शकता. यात कुठेही शंका नाही.
उन्हाळी वळवटाच्या व्यवसायातून 30 महिलांना रोजगार
महिला विकास मंच सदस्य मंगला कुकडे सांगतात, आम्ही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पापड, सरगुंडे, शेवया, पापडा, बटोळे हे सर्व पदार्थ बनवतो आणि विक्रीसाठी स्टॉल लावतो. काही ऑर्डर घरी बसून ऑनलाइन येतात तर काहीसाठी जत्रेमध्ये स्टॉल लावावे लागते. त्याचबरोबर होम डिलीवरी सुद्धा आम्ही करतो.
अनेक महिलांना कामाच्या व्यापातून या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आणि बाकी ऋतुमध्ये सुद्धा या पदार्थांना मागणी असते. आम्ही दरवर्षी यातून 40 ते 50 हजार रूपयाच्या जवळपास उत्पन्न घेतो. हे सर्व काम करतांना आम्हा 30 महिलांना यातून रोजगार मिळतो.
सॅनिटरी नॅपकिन्स विक्रीमधून नफा आणि 10 महिलांना रोजगार
दर्शनाताई पाटणकर सांगतात, आम्ही सॅनिटरी नॅपकिन्सची विक्री गेल्या काही वर्षापासून कॉलेज, सामाजिक संस्था, महिला बचत गट यामध्ये करतोय. त्यातुन यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॉलेजमध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्सच्या मशीन असतात, त्यासाठी आमच्याकडून सॅनिटरी नॅपकिन्स घेतले जाते.
मार्केट पेक्षा कमी दरात असल्याने महिला आणि मुली आवर्जून मागणी करतात. मार्केट मध्ये साधारणतः 35 रुपयांपासून सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहे. यांच्याकडे 25 रुपयांपासून सॅनिटरी नॅपकिन्स विक्रीकरिता उपलब्ध आहे. आम्ही दहा महिला मिळून हा व व्यवसाय सांभाळतो.