Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Group: अदानी समुहाला पुन्हा कर्ज देणार का? क्रेडिट रेटिंग कंपन्यांची बँकांना विचारणा

Adani Group

अदानी समुहाने एकूण कर्जापैकी सुमारे 40% कर्ज भारतीय बँकांकडून घेतले आहे. या कर्जाला धोका निर्माण झाला आहे. अदानी समुहाला पुन्हा कर्ज देणार का? असे क्रेडिट रेटिंग कंपन्यांनी बँकांना विचारणा केली आहे.

अमेरिकास्थित हिंडेनबर्ग या रिसर्च संस्थेने अदानी समुहाबाबत अहवाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या बाजारातील विश्वासर्हतेला तडा गेला आहे. अदानी समुहावर फसवे व्यवहार आणि समभागांच्या किंमती फुगवण्यासह इतरही अनेक आरोप या अहवालात करण्यात आले आहेत. त्यामुळे अदानी समुहाच्या सुचिबद्ध दहा कंपन्यांचे साडेआठ लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अदानी समुहाने एकूण कर्जापैकी सुमारे 40% कर्ज भारतीय बँकाकडून घेतले आहे. या कर्जाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, क्रेडिट मानांकन संस्थांनी बँकांना काही प्रश्न विचारले आहेत.

अदानी समुहाला पुन्हा कर्ज देणार का? (Credit rating companies on Adani debt)

अदानी समुहाला स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वाधिक म्हणजे अडीच बिलियन डॉलरपेक्षाही जास्त कर्ज दिले आहे. जर हे कर्ज बुडीत निघाले तर स्टेट बँक इंडिया दिवाळखोरही होऊ शकते. सोबतच एलआयसी आणि इतरही भारतीय बँकांनी अदानी समुहातील कंपन्यांना कर्ज दिले आहे. अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना परदेशातून कर्ज मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. याआधी अदानी समूह कर्जरोखे तारण ठेवून परदेशी वित्त संस्थांकडून कर्ज घेत होता. मात्र, आता परदेशी वित्त संस्थांनी कर्ज देण्यात मनाई केली आहे. अशा परिस्थितीत अदानी समुहाला देशी गुंतवणूकदारांची गरज भासणार आहे. त्यामुळे पुढील एक वर्षात अदानी समुहाला कर्ज देणार का? असा सवाल पत मानांकन संस्थांनी बँकांना विचारला आहे.

आरबीआयकडून कर्जांची चौकशी (RBI launch inquiry of Adani debt)

अदानी समुहाला दिलेल्या कर्जाचा तपशील सादर करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. यामध्ये काही अनियमितता आहे का? याचा तपास आरबीआयकडून करण्यात येणार आहे. अदानी एंटरप्रायझेसने ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ अर्थात ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णयही नुकताच घेतला आहे. बोली लावलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत करणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले. कंपनीच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदार बुचकळ्यात पडले आहेत.

जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी आता ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत 11व्या क्रमांकावर आले आहेत. गौतम अदानी यांची संपत्ती 36.1 अब्ज डॉलरने कमी होऊन 84.21 अब्ज डॉलरवर आली आहे. या यादीत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर आहेत. म्हणजे आता गौतम अदानी आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात एकाच क्रमांकाचा फरक राहिला आहे.