India Rice Shortage Reasons : तांदूळ हे जगामध्ये सगळ्यात जास्त पिकविल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी, जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पिकविले जाणारे धान्य आहे. तरीदेखील एकीकडे रशिया-युक्रेन युध्द, कृषी मालाच्या किमतीत झपाट्याने होत असलेली वाढ, देशामधील अन्न असुरक्षितता आणि अन्नधान्य महागाई वाढण्याचा धोका या सगळ्यांमुळे तांदळाच्या किमतींवर दबाव वाढू शकतो.
Table of contents [Show]
तांदळाच्या किमती गाठणार उच्चांक
रशिया-युक्रेन युद्ध आणि कोविड महामारी, वाढत्या तापमानामुळे आणि पुरवठा खंडित झाल्यामुळे जगभरात तांदूळ उत्पादनात घट होत आहे. तर मॉस्कोवरील निर्बंधांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. याचा परिणाम म्हणून तांदळाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. फिच सोल्युशन्स कंट्री रिस्क अँड इंडस्ट्री रिसर्चच्या अहवालानुसार, तांदळाच्या किमतीने 2024 पर्यंत सगळ्यात मोठा उच्चांक गाठला असेल.
कोहिनूर फूड्सचे शेअर्स वाढले
भारत हा तांदळाचा अव्वल निर्यातदार देश असल्याने,दीर्घकाळापर्यंत उच्च भाव टिकून राहण्याच्या अपेक्षेने, देशांतर्गत तांदूळ उत्पादकांच्या मालाला भाव मिळाला. परिणामी, केआरबीएल, एलटी फूड्स आणि कोहिनूर फूड्सचे शेअर्स आज शेअर मार्केट मध्ये झपाट्याने वाढले.
निर्यातीवर बंदी घालणे अपेक्षित
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, भारताने देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना लागू केल्या. कारण तांदळाचे मुख्य उत्पादन असणाऱ्या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, उत्पादन कमी झाले. त्यामुळे तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालणे आणि तांदळाच्या इतर ग्रेडवर निर्यात शुल्क आकारणे अपेक्षित होते.
3.5 टक्क्यांनी वाढली निर्यात
मात्र असे कुठलेही नियम न पाळता, भारताने 2022 मध्ये 22.26 दशलक्ष टन तांदूळ निर्यातीचा विक्रम गाठला, जो वार्षिक 3.5 टक्के वाढीचा दर दर्शवितो. निर्यातीच्या या आकड्याने थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि युनायटेड स्टेट्स या चार प्रमुख तांदूळ निर्यातदारांच्या एकत्रित शिपमेंटला सुध्दा मागे टाकले.