आजमितीस बॅंकेच्या सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे बरेच व्यवहार सहज झाले आहेत. तसेच, बॅंकेचे व्यवहार चेक करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे व्यवहारांमध्ये काही गोंधळ वाटत असल्यास तुम्ही लगेच ऑनलाईन तो चेक करु शकता किंवा तुमच्याजवळ अॅप असल्यास त्यावरही तुम्ही पाहू शकता.
पण, बरेच जण ते टाळतात किंवा त्यांना कसे चेक करायचे हे माहिती नसते. पण, स्टेटमेंट चेक केल्याने तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चांवर नियंत्रण मिळवता येते. याशिवाय तुमच्या खर्चाचा हिशोब लागत नसल्यास, चटकण तुम्ही तो पाहू शकता. तसेच, याचे अजूनही बरेच फायदे आहेत.
Table of contents [Show]
व्यवहारांची होईल माहिती
तुम्ही तुमचे बॅंक स्टेटमेंट चेक केल्यास, तुम्ही नुकत्याच केलेल्या व्यवहारांबद्दल जाणून घेता येऊ शकते. त्यामुळे तुम्ही कुठे आणि किती खर्च केला हे समजू शकते. तसेच, व्यवहारात काही तफावत आढळल्यास, तुम्हाला ते माहिती होऊ शकते. त्यानुसार तुम्हाला लगेच कृती करता येते. याशिवाय काही गोंधळ वाटत असल्यास तोही टाळता येतो. त्यामुळे तुम्ही नियमित जरी स्टेटमेंट चेक केले तरी तुमच्यासाठी चांगलेच राहणार आहे.
फसवणूक टाळता येईल
डिजिटल व्यवहारात वाढ झाल्याने ऑनलाईन फसवणुकीतही वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. म्हणूनच जेवढ्यावेळा होईल तेवढ्यावेळा बॅंकेचे स्टेटमेंट चेक करणे आवश्यक आहे. तसेच, अन्य कोणताही व्यवहार तुमच्या संमतीशिवाय झाला नाही, हे शोधायला देखील मदत होणार आहे. याशिवाय तुम्हाला तुमच्या व्यवहारात काही तफावत आढळल्यास, तुम्ही लगेच तुमच्या बॅंकेत संपर्क करु शकता. त्यामुळे स्टेटमेंट चेक केल्याने फसवणूक टाळायला मदत होऊ शकते.
शुल्कांची होईल माहिती
बॅंक व्यवहार आणि सेवांवर काही प्रमाणात शुल्क आकारतात, याची तुम्हाला माहिती नसते. त्यामुळे तुम्ही जर वारंवार चेक केल्यास तुम्हाला त्याची माहिती होऊ शकते. कारण, बॅंक डेबिट कार्ड, डुप्लिकेट पासबुक आणि अन्यही बऱ्याच सेंवासाठी शुल्क आकारते. त्यामुळे तुम्ही ते चेक केल्यास, तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवता येते. तसेच, काही डेबिट केलेले शुल्क, ते देण्यासाठी तुम्ही जबाबदार नसाल तर तुम्ही बॅंकेत त्याविषयी तक्रार करु शकता.
खर्चावर ठेवता येईल नियंत्रण
सध्या सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्याने कोणतीही व्यक्ती खर्च करायला मागे-पुढे पाहत नाही. पण, खर्च जास्त होत असल्यास, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही स्टेटमेंट चेक करु शकता. कारण, कुठे खर्च जास्त होतोय हे तुम्हाला स्टेटमेंटवरुन समजू शकते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक महिन्याला चेक केल्यास तुम्हाला तुमच्या खर्चाचा अंदाजा येऊ शकतो.
बचत गुंतवण्याची मिळेल संधी
तुम्ही तुमचे स्टेटमेंट चेक करुन तुमच्या खात्यातील बचत जाणून घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही तुमच्या खात्यातील जी निष्क्रिय बचत आहे ती गुंतवून त्यावर चांगला रिटर्न मिळवू शकता. तसेच, ही गुंतवणूक दीर्घ काळापर्यंत केल्यास तुम्ही मोठी रक्कम जमा करु शकता. जर तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक असेल तर त्यानुसार तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे धोरण ठरवू शकता.
इतके फायदे पाहिल्यावर तुम्ही महिन्याला चेक न करता. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा जरी तुमचे स्टेटमेंट चेक केल्यास तुम्हाला खूप फायदा होणार आहे. यासाठी तुम्ही बॅंकेचे अॅप डाउनलोड करुन किंवा बॅंकेच्या वेबसाईटवर नेटबॅंकिगद्वारे तुम्ही तुमचे बॅंक स्टेटमेंट चेक करु शकणार आहात.